बहिणीच्या प्रेमसंबंधामुळे गावभर बदनामी : भावाने बहिणीबाबत उचलले टोकाचे पाऊल
शिरवळ : बहिण-भावाचे अतूट नाते असलेतीर बहिणीच्या संबंधामुळे होणारी बदनामी पाहता भावाने बहिणीचा खून केला. पोलिसांनी मात्र हा प्रकार शोधून काढत भावाला बेड्या ठोकल्या. शंकर जिमदार महतो (24, मूळ रा. माझीनियापत्ती ता. माझीसारन जि.छपरा, रा.बिहार, सध्या रा.पळशी ता. खंडाळा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे तर मनीषाकुमार जिमदार महतो (19) असे खून झालेल्या बहिहणीचे नाव आहे.
असे आहे खून प्रकरण
परप्रांतीय सख्ख्या भावाने 19 वर्षीय बहिणीचा स्कार्फने गळा आवळून खून होता अर्थात बहिणीच्या प्रेमसंबंधामुळे बदनामी होत असल्याने त्याने हे पाऊल उचलले. गुठाळे ता.खंडाळा याठिकाणी खळवी नावाच्या शिवारात लिंबाच्या झाडाखाली 19 वर्षीय परप्रांतीय युवतीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत 16 डिसेंबर रोजी आढळला. तपासाअंती हा मृतदेह मनिषाकुमारी जिमदार महतो (वय 19) हिचा असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार स्वप्निल महांगरे याने दिलेल्या फिर्यादीवरुन शिरवळ पोलीस स्टेशनला आकस्मित मयत म्हणून नोंद करण्यात आली.


