अश्लील चाळ्यांची मुभा देणार्या चाळीसगावातील यु.एस.कॅफेची तोडफोड
आमदार मंगेश चव्हाणांचा पुढाकार : चार तरुण-तरुणींना पकडले : कॅफे चालकाविरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा
Vandalism of US Cafe in Chalisgaon, which allowed obscene chalis चाळीसगाव : चाळीसगाव शहरातील हिरापूर रस्त्यावरील नगरपालिका संकुलात यु.एस.कॅफेमध्ये जास्तीचे पैसे आकारून तरुण-तरुणींना अश्लील चाळे करू देण्याची मुभा दिली जात असल्याची माहिती चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांना कळताच त्यांनी मंगळवारी दुपारी सव्वातीन वाजता कॅफेत पोलिसांसह धडक देत चार तरुण-तरुणींना अश्लील कृत्य करताना पकडले. यावेळी आमदारांनी स्वतः या अनधिकृत कॅफेची तोडफोड केल्याने शहरात खळबळ उडाली. या प्रकरणी कॅफे मालक उमाकांत दिलीप अहिरराव(20, जहागीरदारवाडी, चाळीसगाव) याच्याविरोधात चाळीसगाव शहर पोलिसात कॉन्स्टेबल गणेश कुंवर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
आमदारांनी पुढाकार घेत नष्ट केला कॅफे
तरुण-तरुणींना अश्लील चाळे करू देण्यासाठी जास्तीचे पैसे यु.एस.कॅफे चालक आकारत होता शिवाय या कॅफेनजीक राष्ट्रीय महाविद्यालय असल्याने अनेक तरुण-तरुणी या कॅफेत येत असल्याची माहिती चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांना मिळाली होी. मंगळवारी चाळीसगाव शहर पोलिसांना सूचित करीत दुपारी सव्वा तीन वाजता भेट दिल्यानंतर अश्लील प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आले. यापूर्वीदेखील कॅफेच्या बाबतीत तक्रारी आल्यानंतर आमदारांनी स्वतः कारवाई केली होती मात्र आजच्या कारवाईत कॅफेच नष्ट करण्यात आला. तरुण-तरुणींना अश्लील चाळे करू देण्यासाठी एक डार्क रूम तयार करण्यात आली होती ही रूमच आमदारांनी नष्ट केली.


अश्लील प्रकार खपवून घेणार नाही
चाळीसगाव शहरात असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. नगरपालिकेच्या हाकेच्या अंतरावर हा अनधिकृत कॅफे सुरू होता, त्याकडे जर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले असल्यास संबंधित नगरपालिका अधिकार्यांवरदेखील कारवाई होईल, असे आमदार मंगेश चव्हाण म्हणाले. मुलगी ही कोणाच्याही घरची असेना तिच्या इभ्रतीची काळजी घेणे, तिचा सन्मान करणे ही छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्याला शिकवण आहे त्यामुळे या मुलींची नावे पुढे न करता त्यांच्या पुढील शैक्षणिक किंवा दुसरं काही नुकसान व्हायला नको त्याची खबरदारी घेण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. चाळीसगाव शहरामध्ये वा परीसरामध्ये असे चुकीचे प्रकार आपल्या लक्षात येत असतील त्यांनी ते माझ्या निदर्शनास आणून द्यावे, असे आवाहनही आमदारांनी केले आहे. आजचं प्रकरण म्हणजे हे चाळीसगाव शहराला लागलेली कीड आहे. असे प्रकार यापुढे सहन केले जाणार नाहीत, गरज पडली तर अश्या अनधिकृत बांधकामांवर जेसीबी चालवला जाईल, असेही आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले.
या पोलिस कर्मचार्यांचा कारवाईत सहभाग
चाळीसगाव शहरचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार योगेश बेलदार, पंढरीनाथ पवार, दीपक पाटील, शरद पाटील, मोहन सुर्यवंशी, अमोल भोसले, गणेश कुंवर, महिला शिपाई सबा शेख आदींनी कारवाई करीत चार मुलांसह मुलींना ताब्यात घेतले. तपास सहाय्यक निरीक्षक विशाल टकले करीत आहेत.





