जळगावात टेलरींग दुकानाला आग : सहा लाखांचे नुकसान


Fire at a tailoring shop in Jalgaon: loss of six lakhs जळगाव : दुकानाला अचानक आग लागून टेलरिंग मशिन, साहित्य तसेच कपडे जळुन खाक झाले. श्यामा मुखर्जी उद्यानजवळील हाय चाईंस टेलर (क्रमांक
44) येथे ही घटना बुधवार, 27 रोजी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास घडली. या आगीत सुमारे सहा लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा अंदाज
प्रमोद सोनवणे यांच्या मालकीचे हे दुकान आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे रात्री मध्यरात्रीनंतर लागली असावी, असा अंदाज व्यक्तविण्यात येत आहे. आगीत कोट, पॅट,शर्ट, विक्रीसाठी ठेवलेले कापड, शिलाई मशीन हे जळाले. पाच ते सहा ते लाखांचे नुकसान झाल्याची भती व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशमन विभागातील वाहन चालक देविदास सुरवाडे, फायरमन रोहिदास चौधरी, भगवान पाटील, इकबाल तडवी, संतोष तायडे यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !