काय राव तुम्ही कमालच गेली…! जलकुंभाच्या कामासाठी लाच घेणार्या सोग्रस सरपंचासह उपसरपंच एसीबीच्या जाळ्यात
Sub-sarpanch along with Sogrus sarpanch who took bribe for water tank work in ACB’s net नाशिक : गावाचा कारभारी असलेल्या सरपंचांसह उपसरपंचाने जलकुंभ बांधकामानंतर ग्रामपंचायतीच्या हस्तांतरण पत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी तडजोडीअंती 30 हजारांची लाच मागून ती स्वीकारल्याने नाशिक एसीबीने दोघांना बेड्या ठोकल्या. चांदवड तालुक्यातील सोग्रस ग्रामपंचायतीत शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली. भास्कर पुंडलिक गांगुर्डे (55) असे अटकेतील सरपंचांचे तर प्रकाश चंद्रभान गांगुर्डे (45) असे अटकेतील उपसरपंचांचे नाव आहे.
असे आहे लाच प्रकरण
20 वर्षीय तक्रारदार यांच्या मित्राने जिल्हा परीषद अंतर्गत मौजे सोग्रस येथे पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण केले होत. मात्र सदर बांधकामाचे बिल अद्याप मिळाले नसल्याने हे बिल काढण्यासाठी तक्रारदार यांना अधिकारपत्र प्राप्त झाले होते. पाण्याच्या टाकीचे बांधकामाचे बिल मंजूर करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या हस्तांतरण पत्रावर सरपंच या नात्याने आरोपी सरपंच यांनी स्वाक्षरी करून पाठवण्यासाठी शुक्रवारी 50 हजार रुपये लाच मागितली मात्र 30 हजार रुपयांवर तडजोड करण्यात आली. तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला.


यांनी केला सापळा यशस्वी
पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक एसीबीचे पोलिस अधीक्षक अनिल बडगुजर, दीपक पवार, संजय ठाकरे आदींनी हा सापळा यशस्वी केला.





