जानेवारीत ऑपरेशन लोटस् : अंजली दमानियांच्या दाव्याने खळबळ


Operation Lotus in January : Anjali Damania’s claim stirs up excitement मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देशातील राजकीय वर्तुळात खळबळ उडेल असा धक्कादायक दावा केला आहे. त्यांच्या माहितीनुसार, जानेवारी महिनाभरात भाजपाकडून ऑपरेशन लोटस राबवण्यात येत असून सगळ्या निवडणुकांच्या आधी हे होईल. काँग्रेस त्यामुळे फूटणार आहे. राम मंदिर सोहळ्यानंतर किंवा आधीही महाराष्ट्रात या घडामोडी घडतील.देशात विरोधी पक्षच उरणार नाह. त्यामुळे आमच्या सारख्यांनाच विरोधी पक्षाची भूमिका घ्यावी लागेल, लढावे लागेल, असे त्या म्हणाल्या आहेत.

भाजपावरही डागली तोफ
दमानिया पुढे म्हणाल्या की, जो अमाप भ्रष्टाचार चालला आहे आणि भाजपा भ्रष्टाचारांना आपल्या पक्षात ओढून घेतंय ते बघून दु:ख होते. त्यामुळे आम्हाला वेदना होतात. हीच भाजपा भ्रष्टाचाराविरोधात लढायची का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच ज्या लोकांना राजकारणातून उचलून फेकून द्यायला हवे अशा लोकांना देवेंद्र फडणवीस मोठे करतायेत, अशी माझ्या मनात शंका आहे.




पुन्हा लोक तर्कवितर्क लावतातच !
जरांगेबद्दल म्हटलं जाते की ते एकनाथ शिंदेंच्या सांगण्यावरून करतात तसं मीदेखील ऐकलं परंतु मला तसं वाटत नाही. आज लढायचे झाले, तर कुणाविरोधातही लढले तरी त्यामागे बनावट कट रचला जातो. पूर्वी मी खडसेंविरोधात, सिंचन घोटाळ्याविरोधात लढले तेव्हा मी फडणवीसांसाठी लढतेय असं लोक म्हणायचे. पण आज मी फडणवीसांविरोधात लढले तर पुन्हा लोक तर्कवितर्क लावतात, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले आहे. टीव्ही 9 च्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !