रावेर महसूलमध्ये दोन उच्चशिक्षीत तलाठी रूजू
रावेर : महाराष्ट्रात बेरोजगारीचा भस्मासूर मोठ्या प्रमाणात वाढला असून उच्च शिक्षण घेतलेले युवक मिळेल ती नोकरी करण्यास तयार झाले आहेत. स्पर्धेच्या युगात शिक्षणासोबत नोकरीची स्पर्धादेखील वाढली असून त्याचे उदाहरण रावेर महसूलमध्ये समोर आले आहे. रावेर महसूल विभागाला नुकतेच पाच उच्च शिक्षण झालेले तलाठी रुजू झाले आहेत.
उच्चशिक्षीत तलाठी रूजू
निलेश पद्माकर पाटील या बीसीईपर्यंत शिक्षण झालेल्या युवकाला तलाठी म्हणून प्राथमिक स्वरुपात बलवाडी देण्यात आले आहेत. रवी भागवत शिंगणे या बी.ई.मेकॅनिकल युवकाला अटवाडे देण्यात आले आहे तर काजल चुडामण पाटील या बी.ई.इलेक्ट्रॉनिक झालेल्या युवतीला मोरगाव देण्यात आले आहे. भाग्यश्री किशोर बर्वे या एम.कॉम झालेल्या युवतीला थेरोळा तर रोशनी रामचंद्र शिंदे या एम.कॉम झालेल्या युवतीला खिरोदा प्र.यावल देण्यात आले आहे पाचही नवनिर्वाचित तलाठी बुधवारी रावेर तहसील कार्यालयात रुजू झाले. दरम्यान, बेरोजगारी प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे की, तलाठी म्हणून दोन बी.ई इंजिनियर झालेले युवक व युवती तलाठी म्हणून रावेरला रुजू झाले आहे.



