भोपाळमध्ये रेल्वे एफओबी कोसळला : नऊ प्रवासी जखमी


तीन प्रवासी गंभीर : एकाच परीवारातील पाच सदस्यांचाही जखमींमध्ये समावेश : रॅम्पवर चढत असतानाच काही भाग कोसळला

भोपाळ : भोपाळमधील जुन्या रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक दोन व तीनवरील एफओबी (पादचारी पूल) चा काही भाग गुरुवारी कोसळून झालेल्या अपघातात नऊ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यातील तिघांची प्रकृती गंभीर असून अन्य सहा किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एकाच परीवारातील पाच जणांचा समावेश आहे. या अप्रिय घटनेची दखल घेत रेल्वे प्रशासनाने हा पुल वापरासाठी बंद केला आहे. दरम्यान, पूल कमजोर व जर्जर झाल्याने कोसळल्याचे बोलले जात असून प्लॅटफार्म दोनवरून धावणार्‍या गाड्यांच्या मार्गात परीवर्तन करण्यात आले आहे. रेल्वे एडीजी अरुणा मोहन राव यांच्या माहितीनुसार जो रॅम्प पडला तो 1992 मध्ये बनवण्यात आला होता.

एकाच परीवारात पाच सदस्य जखमी
या अपघातात जहागिराबाद येथील एकाच परीवारातील पाच सदस्य जखमी झाले आहेत. परीवारातील सदस्य आसीमा यांच्या माहितीनुसार त्यांच्या परीवारातील मरीयम या गंभीर असून नाहिद, सलीमुर्रहमान, खालिद व मुले अमान व अयान यांना जखमा झाल्या आहेत. हैदराबाद येथून हा परीवार भोपाळ आल्यानंतर रॅम्प चढत असताना अचानक खाली कोसळला. या अपघातानंतर प्रवाशांची प्रचंड आरडा-ओरड झाली.




सर्व रेल्वे स्थानकांची तपासणी होणार
जनसंपर्क विभागाचे पी.सी.शर्मा म्हणाले की, या संदर्भात रेल्वे मंत्री पीयूष गोयल को कमलनाथ जी हे पत्रव्यवहार करून भोपाळसह सर्व रेल्वे स्थानकावरील एफओबीच्या तपासणीची मागणी करतील तसेच सरकार गंभीर जखमींना 50 हजार व जखमींना दहा हजारांची मदत देणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !