अल्पवयीन मुलीवर अत्याचार : संशयिताला तामसवाडी येथून अटक
Abuse of minor girl : Suspect arrested from Tamaswadi जळगाव : प्रेमसंबंध असलेल्या तरुणाशी लग्न करून देण्याची मागणी करणार्या मुलीला अल्पवयीन असल्याने वडिलांनी नकार दिला मात्र त्यानंतरही पळून जाणार्या मुलीसह तरुणाला पोलिसांनी चाळीसगाव तालुक्यातील तामसवाडी येथून ताब्यात घेतले आहे.
अत्याचार उघड : तरुणाविरोधात गुन्हा
पळून गेल्यानंतर मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी लक्ष्मण आण्णा मोरे (19, रा. तामसवाडी, ता. चाळीसगाव) या तरुणाला मेहुणबारे पोलिसांनी अटक केली असून त्याला जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.


याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील एक 16 वर्षीय मुलगी व तामसवाडी येथील लक्ष्मण मोरे यांचे प्रेम जुळले होते त्यामुळे मुलीने तिच्या वडिलांकडे लग्न लावून देण्याची मागणी केली मात्र अल्पवयीन असल्याने वडिलांनी नकार दिला. त्या वेळी दोघांनी पळून जावून लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते 28 नोव्हेंबर 2023 रोजी सटाणा येथे पळून गेले व तेथे एका शेतात राहिले. त्यादरम्यान त्यांच्यात शारीरीक संबंध आले.
