एरंडोलला सराफा व्यावसायीकाचे घर फोडले : लाखाचे दागिणे लांबवले
Bullion dealer’s house burgled at Erandole: Lacquer jewelery stolen
एरंडोल : शहरातील रामचंद्र नगरातील रहिवासी असलेल्या सराफा व्यावसायीकाच्या बंद घराला चोरट्यांनी टार्गेट करीत सुमारे 97 हजारांचे दागिणे लंपास केले. ही घरफोडी 5 ते 8 जानेवारीदरम्यान घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
घरफोडीने शहरात खळबळ
एरंडोल शहरातील पिंगळे ज्वेलर्सचे मालक विकास पिंगळे व त्यांच्या परीवारातील सदस्य भावाच्या घरी वास्तुशांती कार्यक्रम असल्याने पुणे शहरात 5 जानेवारी रोजी गेले होते. घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली. चोरट्यांनी पुढच्या दरवाज्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत दहा ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या तीन अंगठ्या, देवघरातील पाच ग्रॅम वजनाची नगाई देवीची टाक (प्रतिमा), सात ग्रॅम सोन्याची वजनाची पोत, पाच ग्रॅम वजनाचे कानातील चैन स्टॉप, दिड ग्रॅम वजनाची सोन्याची सटी, देवघरातील 80 ग्रॅम वजनाचे चांदीचे सिंहासन, 110 ग्रॅम वजनाचे चांदीच्या पाच देवाच्या प्रतिमा, 150 ग्रॅम वजनाचे चांदीचे ताट वाटी, कपाटातील पर्समध्ये ठेवलेल्या चांदीचे 200 ग्रॅम वजनाचे ब्रासलेट, साखळ्या व जोडवे असा एकूण 97 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला.


अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
पिंगळे यांच्या शेजारी पंडित नारायण महाजन राहतात व त्यांनी पिंगळे यांना घरामागील दरवाजा दरवाजा 6 जानेवारीपासून उघडा असल्याचे सांगितल्यानंतर घरफोडीचा उलगडा झाला. विकास पिंगळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एरंडोल पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, जुबेर खाटीक करीत आहेत.
