महाराष्ट्राची जनता गद्दारांना क्षमा करणार नाही : खासदार संजय राऊत कडाडले
People of Maharashtra will not forgive traitors : MP Sanjay Raut मुंबई : राज्यातील खरी शिवसेना शिंदे यांचीच असून सर्व आमदार पात्र असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी दिला. संपूर्ण राज्यासह देशाचे आजच्या निकालाकडे लक्ष लागले होते. या निकालाने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्षांवर कडाडून टिका केली आहे. बेकायदा विधानसभाध्यक्षांनी हा बेकायदा निर्णय दिल्याचे ते म्हणाले आहे. महाराष्ट्राची जनता गद्दारांना क्षमा करणार नाही. बाळासाहेबांच्या शिवसेनेला वनवासात पाठवण्याचे पाप एकनाथ शिंदे यांनी केल्याचे ते म्हणाले आहेत.
हा तर हिंदूस्तानच्या इतिहासातातील काळा दिवस
हिंदुस्तानच्या इतिहासातील हा काळा दिवस, असे संजय राऊत यांनी आजच्या निकालावर भाष्य केले आहे. शिवसेनेच्या घटनेवर विधानसभाध्यक्षांनी भाष्य करताना उद्धव ठाकरे यांच्या काळात 2018 मध्ये शिवसेना घटनेत झालेले बदल अमान्य केले. 1999 ची निवडणूक आयोगाकडे दिलेली घटना विधानसभाध्यक्षांनी मान्य करीत मूळ पक्षावर एकनाथ शिंदे यांचा असलेला दावा योग्य ठरवला. यावर शिवसेनेची घटना एकनाथ शिंदे की भरत गोगावलेंनी लिहिली आहे? असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला.









