कोळन्हावीतील तरुणाच्या खूनप्रकरणी चौघांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी
यावल (28 जून 2026) : यावल तालुक्यातील कोळन्हावी येथील तरूणाच्या खुन प्रकरणी अटकेत असलेल्या चार संशयीतांची पोलिस कोठडी शुक्रवारी संपल्याने या सर्व चौघं संशयीत आरोपींना येथील न्यायालयात हजर केले असता चौघांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. चौघांची रवानगी जळगाव जिल्हा कारागृहात करण्यात आली.
अपघाताचा बनाव करीत खून
17 जुन रोजी मध्यरात्री नंतर 26 वर्षीय तरुणाचा खुन करून अपघाताचा बनाव संशयीतांनी केला होता व पोलिसांनी तपासाअंती खुन झाल्याचे निष्पन्न केले होते.


कोळन्हावी, ता. यावल येथील रहिवाशी पवन रवींद्र सोळंके (26) या तरुणाची हत्या करीत अपघाताचा बनाव करण्यात आला होता. पोलिस तपासात उमेश दिलीप परदेशी (32, रा.कोळन्हावी), चेतन मोतीराम कोळी (32, रा.डांभुर्णी) व लोकेश दिवाकर महाजन (32, रा.डांभुर्णी) या तिघांनी बुधवार, 17 जुन रोजी मध्यरात्री दारूच्या नशेत झालेल्या वादात त्याची हत्या केल्याचे उघड झाले होते. या तिघांना पोलिसांनी अटक केली होती व मयत पवन याच पार्टीत आणुन सोेडणारा कोळन्हावी येथील रहिवासी कुंदन कैलास सोळुंके याला देखील पोलिसांनी अटक केली होती.
या चौघांची शुक्रवारी पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांना यावल येथील न्यायालयात सह दिवानी न्यायधिश अभिषेक बगे यांच्या समोर हजर केले असता या चौघांना त्यांनी १४ दिवसाची न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. या चौघांची रवानगी जळगाव जिल्हा कारागृहात करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अजयकुमार वाढवे, हवालदार वासुदेव मराठे करीत आहे.
