सातोद-वड्री रस्त्यावरील विद्युत वितरण कंपनीच्या कंत्राटदार आणि विद्युत वितरण कंपनीचे तार चोरी


  1. यावल (28 जून 2028) : यावल तालुक्यातील सातोद या गावापासून वड्रीकडे जाणाऱ्या रस्त्यावर हर्षल पाटील यांच्या शेतात समोरील 33 केव्ही विद्युत वाहिन्यांचे तार चोरी झाले आहे. तब्बल 11 खांबावरील 10 गाल्यातील सुमारे सव्वा दोन लाखाचे तार चोरी झाले.

त्याच भागात विद्युत वितरण कंपनीचे लघु दाबाचे तार ₹देखील चोरी झाले आहे. हा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. याबाबत यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. यापूर्वी देखील मोठ्या प्रमाणावर विद्युत वितरण कंपनीचे कंत्राटदार आणि विद्युत वितरण कंपनीचे तार चोरी झाले असून सदर तार चोरी करणारी टोळीच यावल तालुक्यात सध्या सक्रिय झाल्याची दिसून येत आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

सातोद, ता.यावल या गावापासून वड्रीकडे जाणाऱ्या रस्त्यावर हर्षल पाटील यांचे शेत आहे. त्यांच्या शेतासमोर भवानी इलेक्ट्रिकल्स चे व्यवस्थापक शेखर चौधरी हे विद्युत वितरण चे कंत्राटी पद्धतीने 33 केव्ही विद्युत वाहिन्यांचे काम करीत होते. त्यांनी या भागात 11 ठिकाणी खांब टाकले होते आणि त्याच्यावर उच्च दाबाचे विद्युत तार टाकले होते. 11 खांबावरील 10 गाल्यातील त्यांचे तार चोरी झाले आहे. सुमारे दोन लाख 25 हजार रुपये किंमतीची हे तार होते जे चोरी झाली आहे. त्याचप्रमाणे याच भागामध्ये विद्युत वितरण कंपनीच्या खांबावरील शेतकऱ्यांना शेती पंपाकरीता कनेक्शन साठी खांबावर टाकलेले लघुदाबाचे तारदेखील चोरी झाले आहे. हा प्रकार शनिवारी उघडकीस आले तेव्हा याबाबत यावल पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. यावल तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विद्युत तार चोरी झाले असून मोठी टोळीचं या भागात सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. तेव्हा पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.



चुंचाळे, नायगाव, सातोद, कोळवद येथून तार चोरी
गेल्या महिन्याभराच्या कालावधीमध्ये चुंचाळे, गायरान, नायगाव, सातोद, कोळवद आणि वड्री भागात मोठ्या प्रमाणावर विद्युत तार चोरी झाली आहे. यावल तालुक्यात तार चोरी करणारी मोठी टोळीच सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. तार चोरी करून निर्भयपणे एका मोठ्या वाहनातून हे चोरटे ते तार लांबवत असुन पोलिसांनी याकडे लक्ष देऊन चोरट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !