विधानसभा अध्यक्षांचा निकाल म्हणजे लोकशाहीची हत्या : उद्धव ठाकरे कडाडले


Assembly Speaker’s verdict is murder of democracy : Uddhav Thackeray मुंबई : निवडणूक आयोगाचा निकालच त्यांनी ग्राह्य धरला आहे. निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर केली. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाचे अस्तित्वही शिल्लक राहणार की नाही, हे न्यायालयाने आता ठरवायचे आहे. विधानसभा अध्यक्षांचा हा निकाल म्हणजे एक प्रकारे लोकशाहीची हत्या आहे, असेही ठाकरे म्हणाले. 31 डिसेंबरची तारीख, 10 तारीख अशी चालढकल करायची होती. पक्षांतर बंदीच्या कायद्याला त्यांना संपवायचे आहे त्यामुळे आगामी काळातील मार्ग सोपा करण्याचे काम नार्वेकर करत आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

हा तर सर्वोच्च न्यायालयाचा अवमान
ठाकरे म्हणाले की, नार्वेकरांनी जाऊन आरोपींची दोन वेळा भेट घेतली. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश हे परीमाण मानले जातात. पण नार्वेकरांनी जो निकाल दिला आहे. यातून त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचाच अवमान केला आहे. अर्थात निकालाची मॅच फिक्सिंग होती. आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत, पण जनता देखील यातून सर्वांना धडा शिकवेल, असा विश्वास ठाकरेंनी यावेळी व्यक्त केला.



मग आम्हाला अपात्र का नाही केले
ठाकरे म्हणाले की, जर आमची घटना ग्राह्य धरत नसाल तर आम्हाला अपात्र का केले नाही. निर्णय देताना पायाच चुकला आहे. तो डळमळीत आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला आहे त्यामुळे त्याचा गैरफायदा घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे अस्तित्व टीकणार आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. माझी सर्वोच्च न्यायालयास विनंती आहे की निवडणुकीच्या आधी दूध की दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ द्या, अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टाकडे केली. अवमान याचिका टाकता येते का, याचा विचार करू असे ते म्हणाले. शिंदेंची शिवसेना होऊच शकत नाही, हे सर्व काही सेटिंग होते.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !