नवाब मलिकांना मोठा दिलासा : जामिनाची मुदत सहा महिने वाढवली
Big relief for Nawab Malik: Bail term extended by six months मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्यांच्या सहकार्याच्या संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी फेब्रुवारी 2022 मध्ये अटक करण्यात आलेल्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. जामिनाची मुदत सहा महिने वाढवून मिळाल्याने मलिकांना हा निर्णय दिलासा देणारा ठरला आहे. वैद्यकीय आधारावर मिळालेल्या जामिनाची मुदत वाढवून देण्याबाबत न्यायालयाकडे अलीकडेच विनंती करण्यात आली होती. विशेष म्हणजे यावेळी ईडीकडून कोर्टात मलिक यांच्या या विनंतीला आक्षेप घेण्यात आला नाही.
मुदत वाढीचा मलिकांना मोठा दिलासा
नवाब मलिक यांना त्यानंतर मलिक यांनी त्यांच्या आजारपणाचे कारण देत अंतरिम जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला. मात्र, विशेष न्यायालयाने व त्यापाठोपाठ उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळल्याने मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. आपली एक किडनी काम करत नसून दुसरी किडनी कमजोर असल्याचे कारण त्यांनी जामीन अर्जात दिले होते. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने मलिक यांना वैद्यकीय आधारावर जामीन अर्ज मंजूर केला होता. आता पुन्हा एकदा जामिनाची मुदत वाढवल्याने मलिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.







