पुण्यातील शरद मोहोळ खून प्रकरण : पिस्टल पुरवणार्‍या कर्‍हाडच्या आरोपीला बेड्या


Sharad Mohol murder case in Pune: Accused of Karhad, who supplied the pistol, is in shackles पुणे : राज्यभरात गाजत असलेल्या पुण्यातील शरद मोहोळ खून प्रकरणात संशयिताना पिस्टल पुरवणार्‍या संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. धनंजय मारुती वटकर (रा.कर्‍हाड) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.

संशयिताविरोधात यापूर्वीही गुन्हे
धनंजय वाटकर याच्यावर कर्‍हाडातही यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. ओगलेवाडी येथे मार्च 2023 मध्ये तब्बल चौदा पिस्तुलांसह दहा जणांना अटक करण्यात आली. या गुन्ह्यात वटकर याचा सहभाग होता. या गुन्ह्यामध्ये वटकरला जामीन मिळाला होता. जामिनावर असताना त्याने पुण्यातील शरद मोहोळ खुनात हल्लेखोरांना पिस्तुल पुरविल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे.


हल्लेखोरांसह वकिलही जाळ्यात
पुणे शहरातील शरद मोहोळ याचा कोथरूड भागात भरदिवसा खून झाला होता. या खुनाच्या तपासादरम्यान शरद मोहोळ याच्यावर ज्या गावठी पिस्टलातून गोळीबार झाला त्या पिस्टलाचा पुरवठा कर्‍हाडच्या संशयिताने केल्याचे समोर आल्यानंतर संशयिताला अटक करण्यात आली तर खून प्रकरणी तपास पथकांनी पुणे ते सातारा महामार्गावर संशयित हल्लेखोरांना अटक केली. या गुन्ह्यात दोन वकीलांनाही अटक करण्यात आली आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !