ठाकरे गटाला आता भरत गोगावले यांचा व्हीप लागू होणार : राहुल नार्वेकर
Bharat Gogawle’s whip will now apply to Thackeray group: Rahul Narvekar मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालात शिंदे गट हीच अधिकृत शिवसेना असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्यानंतर ठाकरे गटाला मोठा हादरा बसला तर दोन्ही गटाचे आमदार मात्र नार्वेकर यांनी पात्र ठरवले आहे. नार्वेकर यांनी आता ठाकरे गटाच्या आमदारांना भरत गोगावले यांचाच व्हीप लागू होणार असल्याचे विधान केल आहे. एका पक्षात दोन व्हीप असूच शकत नाही, असे नार्वेकर यांनी म्हटले आहे.
नार्वेकरांनी हा केला मोठा दावा
नार्वेकर म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने सुनिल प्रभू यांची नियुक्ती कायमस्वरुपी योग्य ठरवली अन गोगावलांची नियुक्ती अयोग्य ठरवली, असा समज गैरसमज पसरवला जात आहे. कोर्टाने असे म्हटले की, ज्यावेळी नरहळी झिरवळ यांनी सुनील प्रभू आणि अजय चौधरी यांना निवडले, त्यावेळी 21 जून 2022 रोजी त्यांच्याकडे फक्त उद्धव ठाकरे यांचे पत्र होते. त्यावेळी त्यांच्याकडे एकनाथ शिंदे यांचे पत्र नव्हते. त्यामुळे त्यांना एकच राजकीय पक्ष असल्याचे वाटले, त्यामुळे त्यांनी दोघांची निवड केली.


सुप्रीम कोर्टाने सांगितले की अध्यक्षांनी आता राजकीय पक्ष कुणाचा हे ठरवावे, आणि त्यांनतर प्रतोद आणि विधिमंडळ नेत्यांची निवड करावी. त्यामुळे हा जो गैरसमज पसरवला जात आहे तो अत्यंत चुकीचा आहे. मी जो निर्णय दिला आहे तो सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईड लाईन्स पळून 100 टक्के दिला आहे.





