चाळीसगावातील विद्यार्थी घेताहेत शिवकालीन मर्दानी खेळांचे धडे
आ.बं.विद्यालयाचा उपक्रम : 50 विद्यार्थी करणार प्रजासत्ताकदिनी सादरीकरण
Students of Chalisgaon take lessons in manly games of Shiva period चाळीसगाव : मैदानी खेळासोबत शरीर सौष्ठवाचे उत्तम प्रतीक असणार्या शिवकालीन मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांचे प्रशिक्षण येथील चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या आ.बं.विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी घेत आहे. प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ शनिवारी संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे उपाध्यक्ष योगेश अग्रवाल यांच्याहस्ते झाला. याचं खेळांचे प्रात्यक्षिक हे विद्यार्थी प्रजासत्ताकदिनी सादर करणार आहे.
मर्दानी खेळांमधून शारिरिक कसरतींना वाव
मुलांमध्ये मोबाईलचे वाढते आकर्षण असून तास न तास ते आनस्क्रीन असतात. यामुळे मैदानी खेळांकडे त्यांचे दूर्लक्ष होत आहे. पारंपारिक खेळ हा शरीरसौष्ठवाचा चांगला स्रोत आहे. शिवकालिन मर्दानी खेळांमधून शारिरिक कसतींना चांगला वाव मिळतो. विद्यार्थ्यांना याव्दारे थेट शिवकालिन खेळांचा परिचय देखील व्हावा. या उद्देशाने आ.बं. विद्यालयाने नेवासेस्थित राजे शिवकालीन मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्थेचे सुरेश लव्हाटे, दिव्या चक्रनारायण व निरंजन वालतुरे यांना आमंत्रित करुन प्रशिक्षण शिबिर भरविले आहे. हे प्रशिक्षण 12 दिवस चालणार आहे. यावेळी आ.बं. मुलींच्या विद्यालयाचे अध्यक्ष अड. प्रदीप अहिरराव, मुख्याध्यापक के.एन.तडवी, सुलोचना इंगळे, सुजितकुमार पवार, जिजाऊ समितीच्या अध्यक्षा सोनल साळुंखे, जयेश कुमावत, संजय सोनवणे अदीउपस्थित होते.


- 50 विद्यार्थ्यांचा सहभाग
शिवकालिन मर्दानी खेळ प्रशिक्षण शिबिरात 25 विद्यार्थी व 25 विद्यार्थिनी असे एकुण 50 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहे. - पुढील 12 दिवस हे विद्यार्थी मर्दानी खेळांचे धडे गिरवतील.
- प्रजासत्ताकदिनी शिबिरात सहभागी झालेले विद्यार्थी आपली प्रात्यक्षिके सादर करणार आहे.
- मर्दानी खेळांचे धडे देणारी आ.बं.विद्यालय ही तालुक्यातील पहिलीच शाळा आहे.
- मर्दानी खेळात विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले आहे. पहिल्याच दिवशी 40 विद्यार्थी उपस्थित होते.
- गुणवंत विद्यार्थी घडविणे हे आमचे ध्येय आहे. मात्र त्यांची शारिरीक स्थितीही सशक्त व बळकट असावी. मानसिक व शारिरिक विकास खेळांव्दारे होतोच. शिवकालिन मर्दानी खेळ याचे चांगले उदाहरण आहे. या प्रशिक्षण शिबिरात तयार झालेले विद्यार्थी पुढे इतर विद्यार्थ्यांना खेळांचे प्रशिक्षण देणार आहे. विद्यार्थ्यांचा प्रतिसादही चांगला आहे.
-योगेश अग्रवाल
उपाध्यक्ष, व्यवस्थापन मंडळ, चाएसो, चाळीसगाव





