अट्टल मोटारसायकल चोरटा जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात


चोपड्यासह जळगावातील चोरीचा उलगडा : अन्य गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

जळगाव : अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या जळगाव गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या असून आरोपीने चोपड्यासह जळगावात चोरी केलेली दुचाकी पोलिसांना काढून दिली आहे. आरोपीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. अफसर हुसेन मन्यार (19, रा.मदनीनगर, अडावद, ता.चोपडा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

दोन दुचाकी जप्त
आरोपीने चोपडा शहरातून 31 जानेवारी रोजी भागवत पाटील यांची दुचाकी लांबवली होती तसेच 10 फेब्रुवारी 2020 रोजी जळगावातील शामाप्रसाद मुखर्जी उद्यानाजवळील काकाजी लॉजसमोरून समाधान मुकुंदा भालेराव (रा.धामणगाव) यांची दुचाकी लांबवली होती. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता. दोन्ही गुन्ह्यातील दुचाकी जप्त करण्यात आल्या




यांनी आवळल्या आरोपीच्या
पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांच मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम, हवालदार नारायण पाटील, रामचंद्र बोरसे, मनोज दुसाने,परेश महाजन, प्रवीण हिवराळे, दीपक पाटील आदींनी अडावद गावातून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, आरोपीला जळगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !