मंत्री गिरीश महाजनांना आमदार खडसेंनी खेचले कोर्टात ; जाणून घ्या नेमकी बातमी


जळगाव : जळगाव जिल्ह्यात दोन मातब्बर नेते असलेल्या मंत्री गिरीश महाजन व आमदार एकनाथराव खडसे यांच्यातील विळा-भोपळ्याचे नाते राज्याला ठावूक आहे. त्यातच आता पुन्हा आमदार एकनाथराव खडसे यांनी एका प्रकरणात मंत्री महाजनांविरोधात दावाच कोर्टात दाखल केल्याने राजकीय वर्तुळात हा विषय चर्चेचा झाला आहे.

अवघ्या एक रुपये मानहानीचा दावा
आमदार खडसेंनी मंगळवारी गिरीश महाजनांवर जळगावच्या कोर्टात फौजदारी दावा दाखल केला. गिरीश महाजन हे आपल्या विरोधात वारंवार बदनामीकारक वक्तव्य करत असल्याचा खडसेंचा आरोप आहे. याच अनुषंगाने त्यांनी महाजन यांच्या विरोधात मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांकडे फौजदारी खटला दाखल केला. तर नुकसान भरपाईसाठी दिवाणी न्यायाधीशांकडे 1 रुपयांचा दावा केलाय.



बदनामीकारक वक्तव्य : आजारावरही घेतली शंका
गिरीश महाजन यांनी वारंवार खोटे नाटे विधाने करून मला छळण्याचं काम केलं. तसंच बदनामीकारक वक्तव्य करून समाजात माझी बदनामी केली. मागच्या काळात मी हृदयविकाराने आजारी असतानाही त्यांनी माझ्या आजारपणाबद्दल शंका उपस्थित केली. माझ्या मुलाच्या मृत्यूबद्दल देखील संशयास्पद वक्तव्ये केली. म्हणून मी त्यांच्या विरोधात फौजदारी खटला दाखल केला असल्याचे आमदार खडसे म्हणाले आहेत. एक रुपयांची किंमत निश्चित माझी लेखी नाही मात्र अब्रुनुकसानीसाठी भरपाई म्हणून एक रुपयांचा दावा दाखल केल्याचे आमदार खडसे म्हणाले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !