भुसावळात आज गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रम
भुसावळ : गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त शहरात शनिवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गजानन महाराज प्रकट दिनानिमीत्त यावल रोडवरील गजानन महाराज मंदिरावर रोषणाई करण्यात आली आहे. तर दुपारून प्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. शहरातील रामकृष्ण नगरातील नवीन म्हाडा कॉलनीजवळील दत्तनगरात नवीन मंदीरात गजानन महाराज यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा शुक्रवारी करण्यात आली. सकाळी 8 ते 10 गजानन महाराज मुर्तीची मिरवणूक, नंतर दोन तास गणपती पुण्यवाचन, दुपारी 1 ते 4 पर्यत प्राणप्रतिष्ठा, स्थापित देवता हवन, विजय ग्रंथ पोथी वाचन करण्यात आले. शनिवारी काळी आठला पंचोपचार पूजन, हवन बलिदान पूजन, दुपारी बाराला प्रकट दिन, आरती, महाप्रसाद दिंडी, व विजयग्रंथ वाचन होईल, असे मंदीराचे संचालक मधुकर ढाके यांनी कळविले आहे. हनुमान पेठेतील विजय कुळकर्णी यांच्या घरी सुध्दा गजानन महाराज प्रकट दिनानिमीत्त कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
