बोदवड शहरात 40 कार सेवकांचा सत्कार
बोदवड : रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा अयोध्येत झाल्यानंतर बोदवड तालुक्यातील आनंदोत्सव साजरा करण्यात आला तसेच कार सेवकांचा यावेळी सहृदय सत्कार करण्यात आला. यावेळी खंडेलवाल परिवार व वृषभ ट्रॅव्हल्सद्वारे कारसेवकाच्या परीवाराला अयोध्यायधाम यात्रा मोफत करण्यात येईल, असे कार्यक्रमान खंडेलवाल परिवारातर्फे श्री संत गजानन महाराज सेवा संस्थेचे अध्यक्ष अनिल खंडेलवाल यारनी जाहिर केले.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
बोदवड शहरातील नाव नसलेल्या कॉलनीचे अयोध्या नगर नामकरण करण्यात आले. नगराध्यक्ष आनंदा पाटील यांच्याहस्ते तर बडगुजर नवयुक संघटनेद्वारा संपूर्ण शहरात प्रसाद वाटप करण्यात आला. मनुर बु.॥ येथे तीन दिवस कार्यक्रम झाला. गायत्री परीवारातर्फे अखंड जप, गायत्री यज्ञ तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील यांनी संपूर्ण गावाला जेवण दिले. त्यांचे लहान बंधू पंजाबराव पाटील यांनी विठ्ठल रुक्मिणी मूर्तिची मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली. शेलवड येथे सुद्धा श्रीराम मंदिरात तीन दिवस विविध कार्यक्रम झाले.








