तर इंडिया आघाडीत केवळ काँग्रेसच शिल्लक राहिल : शिवसेना नेते अभिजीत अडसूळ


Only Congress will remain in India Alliance : Shiv Sena leader Abhijit Adsul अमरावती : शिवसेना नेते अभिजीत अडसूळ यांनी इंडिया आघाडीबाबत मोठे विधान केल्याने या विधानाची मोठी चर्चा होत आहे. इंडिया आघाडीत रोज एक नेता उठतो आणि स्वत:ला पंतप्रधान म्हणून प्रमोट करतो. 28 पक्षातील नेते मग नीतीश कुमार, शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी हे प्रत्येक दिवस मनातल्या मनात पंतप्रधान झालेत पण जेव्हा त्यांना कळतं, आपलं इथं काही होणार नाही तेव्हा एक एक करून ते बाहेर पडतील, असा टोला अडसूळांनी लगावल्याने नेते अंतर्मुख झाले आहेत.

तर काँग्रेस इंडिया आघाडीत एकमेव पक्ष असेल
अडसूळ म्हणाले की, लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी जागा वाटप करावे लागेल त्यावरून इंडिया आघाडीत पुन्हा भांडणे होणार आहेत. शेवटी काँग्रेस ही एकमेव त्या आघाडीत राहणार आहे.



अमरावती मतदारसंघावर आम्ही दावा करतोय. 20 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेल. अमरावतीत नवनीत राणा यांनी खोटी प्रमाणपत्रे देऊन निवडून आल्यात. सुप्रीम कोर्टाने न्याय दिला नाही तर कदाचित अशा राखीव जागेवर बोगस प्रमाणपत्रे देऊन असे लोक उभे राहतील. मग अन्याय झालेले लोक सुप्रीम कोर्टाविरोधात भाष्य करतील, असं त्यांनी म्हटल आहे.

 










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !