मराठा समाज आंदोलनाला मोठे यश : मनोज -जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य
Maratha Samaj movement a big success : All demands of Manoj-Jarange Patal accepted मुंबई : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या सर्व मागण्या शासनाने मान्य केल्या असून मध्यरात्री अध्यादेश देखील काढला. या अध्यादेशात सग्यासोयर्यांच्या मुद्याचाही समावेश करण्यात आला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी मुंबईतील वाशी येथे दाखल होत मनोज जरांगे पाटील यांना ज्यूस पाजून त्यांचं उपोषण सोडले. दरम्यान, यावेळी राज्यातील दोन उपमुख्यमंत्री मात्र अनुपस्थित होते.
हा राज्यातील सर्व मराठ्यांचा विजय
मनोज जरांगे पाटील यावेळी वाशीतील सभेत म्हणाले की, हा विजय महाराष्ट्रातील सगळ्या मराठ्यांचा आहे. अध्यादेशाला धोका झाला तर परत आझाद मैदानावर येणार, असं मनोज जरांगे यांनी ठणकावून सांगितले.
केलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह, मंत्री दीपक केसरकर, मंत्री गिरीश महाजन, आमदार संजय शिरसाट, शासनाचे सचिव सुमंत भांगे देखील उपस्थित होते.


जरांगेंचा स्पष्ट इशारा : गुलालाचा अपमान होवू देवू नका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुम्हाला आमची एकच विनंती आहे की, सगेसोयर्यांबाबत जो अध्यादेश तुम्ही काढला आहे, ज्याची कुणबी नोंद मिळाली त्याच्या गण-गोत्यातील सगळ्या सोयर्यांना त्याच जात प्रमाणपत्र मिळणार आहे. याच मागणीसाठी जो गुलाल उधळलाय, त्याचा अपमान होऊ देऊ नका..तुम्ही काढलेला अध्यादेश कायम टीकला पाहिजे. ही जबाबदारी तुमची आहे, असं मनोज जरांगे यांनी यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी चांगले काम केले
जरांगे म्हणाले की, आमचा विरोध आता संपला आहे. आमच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहे. मुख्यमंत्र्यांनी चांगले काम केले आहे. मध्यरात्री पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांनी ही घोषणा केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मी ज्यूस पिऊन उपोषण सोडणार असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितले. तसेच नवी मुंबईतूनच गुलाल उधळत आम्ही सर्वजण आपापल्या घरी जाणार असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितले.







