मध्यप्रदेशात शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना : रावेरात निषेध
रावेर : मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील सौंसर शहरात अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सौंसर प्रशासनाने जेसीबीच्या साह्याने काढल्याने शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना होवून समस्त शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. दोषींवर कारवाई करण्याची मागणी प्रसंगी करण्यात आली. छत्रपती शिवरायांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन रयतेचे स्वराज्य निर्माण करून गोर-गरीबांवरील अन्याय थांबवला. न्याय-प्रिय जाणता राजा म्हणून शिवाजी महाराज यांची किर्ती असताना त्यांच्या पुतळ्याला हात लावण्याची मजल मध्य प्रदेशात होतेच कशी? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.
यांची होती उपस्थिती
प्रशासनाला निवेदन देताना राजे छत्रपती शिवाजी व्यायाम शाळेचे अॅड. लक्ष्मीकांत शिंदे, राजेश शिंदे, प्रकाश पाटील, विजय महाजन, जितेंद्र महाजन, राम शिंदे, शाम शिंदे, संदीप शिंदे, दीपक शिंदे, अमोल पाटील, प्रदीप शिंदे, रवींद्र महाजन, कल्पेश महाजन, विकी महाजन आदींची उपस्थिती होती.



