भुसावळ विभागातून धावणार्‍या सहा रेल्वे गाड्या रद्द


हजरत निजामुद्दीन-फरीदाबाद सेक्शनमध्ये नॉन इंटरलॉकींगसह चौथ्या रेल्वे लाईनीचे काम

भुसावळ : दिल्ली जवळील हजरत निजामुद्दीन-फरीदाबाद सेक्शनमध्ये रेल्वे प्रशासनाकडून नॉन इंटरलॉकींगचे काम आणि चवथ्या लाईनीचे काम सुरू असल्याने रेल्वे प्रशासनाकडून कामाच्या वेळेत ब्लॉक घेण्यात आला असल्याने हजरत निजामुद्दीनवरून सुटणार्‍या आणि भुसावळ विभागातून धावणार्‍या तब्बल सहा रेल्वे गाड्या रेल्वे प्रशासनाकडून रद्द करण्यात आल्या आहे. दरम्यान, या गाडीचे दोन ते तीन महिने अगोदरच तिकीट काढलेल्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होणार आहे.

सहा रेल्वे गाड्या रद्दने गैरसोय
रद्द गाड्यांमध्ये डाऊन 11077 पुणे-जम्मूतवी झेलम एक्सप्रेस 25 ते 27 दरम्यान प्रारंभीक स्थानकापासून रद्द करण्यात आली आहे तर अप 11078 जम्मूतवी-पुणे झेलम एक्स्प्रेस 27 ते 29 दरम्यान रद्द करण्यात आली आहे. डाऊन 12171 लोकमान्य टिळक टर्मिनस-हरीद्वार-एक्स्प्रेस 24 रोजी रद्द करण्यात आली आहे. अप 12172 हरीद्वार-लोकमान्य टिळक टर्मिनस -एक्स्प्रेस 25 रोजी रद्द करण्यात आली आहे. डाऊन 12617 एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन मंगला एक्सप्रेस 23 ते 25 दरम्यान रद्द करण्यात आली आहे. अप 12618 हजरत निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेस 26 ते 28 दरम्यान रद्द करण्यात आली आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !