सखी श्रावणीच्या महिलांनी वाहिली पुलवामा शहिद जवानांना श्रद्धांजली
भुसावळ : पुलवामा येथे झालेल्या आतंकवादी भ्याड हल्ल्याला 14 फेबु्रवारीला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर 44 जवान शहिद झाल्याने या वीर जवानांच्या बलिदानाच्या स्मृतीस येथील सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या महिलांनी अभिवादन करीत श्रद्धांजली वाहिली. स्थानिक नाहाटा चौफुली येथील शहिद स्मारकावर मेणबत्ती लावून या वीर जवांनाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी महिला संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नेवे यांच्यासह माया चौधरी, मोहिता चौधरी, सुनीता चौधरी, इंद्रा चौधरी, रोहन पाटील, ओम चौधरी, मयुर, क्रिशी नेवे, अनुराधा टाक, आराधना टाक, मनीषा वानखेडे, मंदाकिनी केदारे, रुपाली नेवे, राधिका वाणी यांच्यासह महिलांनी शहीद स्मारकास अभिवादन केले व श्रद्धांजली वाहिली.
