40 पट दंडाची रक्कम कमी करावी : फैजपूरात व्यावसायीकांचा सूर


फैजपूर : अनधिकृत अकृषिक जमिन वापराबाबत उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात फैजपूर व सावदा येथील व्यावसायिकांची बैठक झाली. याप्रसंगी प्रशासनाने 40 पट दंडाबाबत दिलेल्या नोटीसीनंतर दंडाची रक्कम कमी करण्याची मागणी व्यावसायीकांनी प्रशासनाला केली.

यांची होती उपस्थिती
अनधिकृत अकृषिक जमिनीचा वापर करत असलेले व्यावसायीक ज्यांचे व्यवसाय रहिवास प्रयोजनार्थ जागेत आहेत, ज्यांनी व्यावसायीक परवानगी घेतलेली नाही असे शाळा, डॉक्टर, हॉटेल, किराणा, दुकानदार व्यावसायीक यांनी तलाठी, फैजपूर-सावदा यांनी वापरात बदलाच्या 40 पट रक्कम दंड भरण्याची नोटीस दिलेली होती त्या सर्व व्यावसायीकांची फैजपूर प्रांत कार्यालयात डॉ.अजित थोरबोले यांनी सोमवारी दुपारी दोन वाजता बैठक घेतली. यावेळी आमदार शिरीष चौधरी, नगरसेवक केतन किरंगे, फैजपूर मंडळाधिकारी जे.बी.बंगाळे, सावदा मंडळाधिकारी रशीद तडवी आदी उपस्थित होते. दरम्यान, फैजपूरात 64 व्यावसायिक यांना नोटीस देण्यात आल्यानंतर 34 जणांनी रक्कम भरली व त्यापैकी 27 जणांनी रक्म न भरल्यामुळे त्यांना बोलवण्यात आले होते. 27 व्यावसायीकांकडून सुमारे दंडाची रक्कम 16 लाख रुपये येणे आहे.




मंदीमुळे दंड करावा कमी
ऑनलाईन खरेदीमुळे व्यवसाय कमी चालतो, मंदीचे सावट आहे. मध्यंतरी दुष्काळामुळे मंदी असून पाहिजे तसा व्यवसाय होत नाही. वेगवेगळे टॅक्सेस असल्याने व्यवसाय करणे जिकरीचे झाले आहे. व्यावसायीक जागेचा जेव्हढा वापर होत आहे तेवढीच रक्कम आकारावी शिवाय 40 पट दंडाची रक्कम
कमी करावी, असा सूर व्यावसायीकांमधून उमटला.

नियमानुसार बदल करणार -प्रांताधिकारी
अनधिकृत वापर केल्यामुळे दुकान, शाळा हॉस्पिटल यांना रक्कम भरावीच लागणार आहे. आजच्या बैठकीत रक्कम कमी करावी, अशी मागणी होती नियमानुसार जो बदल करता येईल ते करणार असल्याचे प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले म्हणाले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !