जळगावातील 15 वर्षीय बालिकेचा रेल्वे रूळाजवळ आढळला मृतदेह
मारहाण करून मृतदेह रेल्वे रूळाजवळ फेकल्याचा संशय : पोलिसांकडून कसून तपास
जळगाव : शहरातील कांचन नगरातील रहिवासी तसेच नंदिबाई विद्यालयातील 15 वर्षीय विद्यार्थीनी शनिवारपासून बेपत्ता असतानाच सोमवारी सकाळी आसोदा रेल्वेगेटजवळ कोमल हिरामण सोनवणे या बालिकेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या बालिकेला मारहाण करून नंतर मृतदेह रेल्वेरुळाशेजारी आणुण टाकल्याचा पोलिसांना संशय असून त्यादृष्टीने पोलिस तपास करत आहेत.
रेल्वे गेटमनला दिसला मृतदेह
कोमल हिरामण सोनवणे हीह नंदिनीबाई विद्यालयात इयत्ता दहावीचे शिक्षण घेत होते. कोमल शनिवारपासुन घरातून बेपत्ता झाली होती, कुटूंबीयांनी दिवसभर शोध घेवुन रात्री शनिपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरुन अज्ञात तरुणाच्या विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज सकाळी पावणे नऊवाजेच्या सुमारास आसोदा रेल्वेगेटवरील गेटमन सनकलाल दुबे यांना रुळापासून बर्याच लांब झुडपात मृतदेह पडल्याचे आढळून आले. दुबे यांनी स्टेशन मास्टर आणि शनिपेठ पोलिसांना कळवल्यावरुन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. असोदा रेल्वेगेट जवळ मृतदेह आढल्याचे वृत्त कळताच कांचनगर, जैनाबादसहीत परिसरातील रहिवाश्यांनीही धाव घेतली. मृतदेह उचलून जिल्हा रुग्णालयात आणण्यात आल्यावर परिसरातील रहिवाश्यांसह मुलीचे वडील हिरामण सोनवणे यांनी मृतदेह पाहताच हंबरडा फोडला. मुलीची ओळख पटल्यावर पंचनामा करुन शवविच्छेदनास सुरवात करण्यात आली.



बेदम मारहाणीमुळे झाला मुलीचा मृत्यू
कोमल हिचा शवविच्छेदन अहवालानुसार बेदम मारहाणीत पोटात रक्तश्राव झाल्याने मृत्यू झाल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे तिला मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतर तिला असोदा रेल्वेगेटजवळ असलेल्या झुडुपात फेकून दिल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यादृष्टीने पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनात शनिपेठ पोलिस तपास करीत आहेत.
