यावल तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू


यावल : वेगवेगळया घटनांमध्ये तालुक्यातील दोन जणांनी आत्महत्या केल्या. याबाबत पोलिसात अक्समात मृत्युच्या नोंदी करण्यात आल्या. पहिल्या घटनेत राजु भागवत बोदडे (42, रा.वढोदे प्रगणे सावदा) हे 16 फेब्रुवारीच्या दुपारपासुन बेपत्ता असताना यांचा मृतदेह गावाजवळ असलेल्या ग्रामपंचायतीच्या कोरड्या विहिरीत आढळला. बोदडे यांनी आत्महत्या का केली? हे मात्र समजु शकले नाही. दुसर्‍या घटनेत न्हावी येथील नामदेव वाड्यातील वसंत पांडुरंग चोपडे (56 वर्ष) यांनी 16 फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील छतावरील पंख्याला बांधलेल्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या केली. वसंत चोपडे यांचे दहा वर्षापुर्वी आपल्या पत्नीशी घटस्फोट झालेला आहे. तेव्हापासुन ते आपल्या घरात एकटेच राहात असल्याचे कळते. या दोघं मृतदेहांचे यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांना सोपविला. याबाबत यावल आणि फैजपूर पोलिस स्थानकात अकस्मात मृत्युच्या नोंदी करण्यात आल्या.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !