भुसावळ शहरात सामूहिक व्रतबंध सोहळा उत्साहात


Mass fasting ceremony in Bhusawal city in high spirits भुसावळ : शहरातील ब्राह्मण संघात वसंत पंचमीच्या मुहूर्तावर सामूहिक व्रतबंध सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात चार बटुंनी नोंदणी केली होती. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी सहा वाजता गणेश पूजनाने झाली. यावेळी देवेंद्र गुरुजी यांनी व्रतबंधाचे सर्व विधी पार पाडले. सामूहिक व्रतबंध कार्यक्रमासाठी गोडबोले यांच्या बॅण्ड पथकाने निःशुल्क सेवा दिली.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
कार्यक्रमासाठी शहरातील प्रमुख ब्राह्मण मंडळांना आमंत्रीत करण्यात आले. यजुर्वेदी मंडळाचे सुरेशराव कुलकर्णी, गजानन जोशी, रामभाऊ गचके, कण्व शाखेचे रमाकांत भालेराव यांचा समावेश होता. यशस्वीतेसाठी ब्राह्मण संघाचे सहसचिव आमोद टेभुंर्णीकर, कोषाध्यक्ष प्रसन्न गंधे, सुधीर देशपांडे, संजय बोचरे यांच्यासह पदाधिकारी व सदस्यांनी परीश्रम घेतले.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !