भुसावळात नमो चषक प्लास्टिक बॉल स्पर्धेत कडूप्लॉट सीसी संघ विजयी

प्रभाग क्रमांक सहामध्ये नमो चषक अंतर्गत स्पर्धेचे आयोजन


Kaduplot CC team won the Namo Cup plastic ball competition in Bhusawal भुसावळ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नमो चषक अंतर्गत भव्य प्लास्टिक बॉल क्रिकेट टुर्नामेंट स्पर्धेचे शुक्रवार, 16 फेब्रुवारी रोजी उद्घाटन जिल्हा सरचिटणीस परीक्षीत बर्‍हाटे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, शहराध्यक्ष युवराज लोणारी यांच्यातर्फे करण्यात आले. 22 संघांनी सहभाग नोंदवला तर मंगळवार, 20 रोजी स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष युवराज लोणारी, सरचिटणीस रमाशंकर दुबे, श्रेयस इंगळे, माजी नगराध्यक्ष प्रमोद नेमाडे, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, देवेंद्र वाणी, किरण कोलते, शेखर इंगळे, युवा मोर्चा अध्यक्ष गौरव आवटे, वैभव लोणारी, ओबीसी सेल अध्यक्ष भावेश चौधरी, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष राहुल तायडे, प्रमोद पाटील, सागर चौधरी, सागर जाधव, हरमीत सिंग माखन, ऋषिकेश पाटील, रुपम सरोदेतसेच परीसरातील कार्यकर्ते व क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते, पंच म्हणून मनोज कोळी, आकाश भोळे, जय खरारे, शुभम भोई, रोहित कोळी, दुर्गेश भोई यांनी काम पाहिले. प्रथम बक्षीस भा.ज.पा सरचिटणीस श्रेयस इंगळे तर द्वितीय बक्षीस माजी नगराध्यक्ष प्रमोद नेमाडे यांच्यातर्फे देण्यात आले. प्रथम-द्वितीय आणि बेस्ट बॉलर-बॅट्समन ट्रॉफी विशाल दुग्धालय यांच्यातर्फे देण्यात आल्या. स्पर्धेचे आयोजन कडू प्लॉट मित्र परिवार तर नियोजनासाठी कोळी वाडा व श्रेयस इंगळे मित्र परिवाराकडून मदत झाली. दरम्यान, स्पर्धेतील विजेता संघ कडूप्लॉट सीसीला प्रथम बक्षीस भा.ज.पा. सरचिटणीस श्रेयस इंगळे तर उपविजेता संघ सोसायटी वारीअर्सला द्वितीय बक्षीस माजी नगराध्यक्ष प्रमोद नेमाडे यांच्यातर्फे देण्यात आले.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !