वरणगावच्या विकासासाठी कटीबद्ध : सिद्धेश्‍वरनगर जि.प. शाळाही टाकणार कात


वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे : जिल्हा परीषद सिध्देश्वरनगर शाळेत स्नेहसंमेलन रंगले

वरणगाव : जिल्हा परीषद प्राथमिक मराठी शाळा, सिद्धेश्वरनगरमध्ये स्नेहसंमेलन नुकतेच झाले. उद्घाटक म्हणून वरणगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष सुनील काळे होते. ते म्हणाले की , शाळेसाठी जिल्हा परीषदेकडून निधी मिळविण्याचा पुर्ण प्रयत्न सुरू असून तसे आश्वासन मिळालेले आहे.सिद्धेश्वरनगरमधून माझी सुरुवात असून मी आपल्या गावच्या विकासासाठी बांधील असल्याचेही ते म्हणाले. यावेळी उपनगराध्यक्ष शे.अखलाक अहेमद युसूफ शे., नगरसेविका प्रतिभा चौधरी, माला मेढे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपक धनद्रवे, मुख्याध्यापक सुपडू राखुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांनी समूहनृत्य, वैयक्तिकनृत्य, नाटक, गणिती उखाणे, संवाद सादर केले. स्वच्छता, मुलगा मुलगी समानता, पर्यावरण, अंधश्रद्धा अशा विषयांवर जनजागृती करण्यात आली.

यांनी घेतले परीश्रम
प्रास्ताविक रवींद्र पंडित म्हसाणे तर सूत्रसंचलन अनिल सोमदेव देशपांडे यांनी केले. मनोगत विलास अवचित तायडे तर आभार प्रदर्शन छगन कडू पवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी वंदना सुरेश पाटील, अनिता भास्कर जाधव, मीनाक्षी परेश ठोंबरे व अनिता शामराव महाले यांनी परीश्रम घेतले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !