अंतर्नाद शिवरायांचे आचार, विचार बालमनावर रुजवण्याचे वकृत्व स्पर्धेतून करतेय काम : अमोल जावळे

अंतर्नाद आयोजित जिल्हास्तरीय महावकृत्व स्पर्धेत 459 स्पर्धकांचा सहभाग


Antaranad Shivraya’s behavior and ideas are being inculcated in children’s minds through competition: Amol Jawle भुसावळ : छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि जीवनयात्रा ही युवा पिढीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरत असते. शिवरायांच्या विचारांचा जागर व्हावा यासाठी अंतर्नाद प्रतिष्ठानने सलग सातव्या वर्षी हा उपक्रम राबविला आहे. स्पर्धेच्या माध्यमातून शिवरायांचे आचार, विचार बालमनावर पेरण्याचे काम होत असून याच विचारांनी भविष्यातील सुसंस्कारित नागरिक आणि समाज घडेल असे प्रतिपदान भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी केले. अंतर्नाद प्रतिष्ठान भुसावळ तर्फे रविवार, 25 रोजी जिल्हास्तरीय महावकृत्व स्पर्धा घेण्यात आली. त्या स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातून 459 स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यांनी वक्तृत्वातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची थोरवी कथन केली.

यांची स्पर्धेसाठी उपस्थिती
ताप्ती स्कूलमध्ये ही स्पर्धा झाली. उद्घाटन ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश फालक, भाजपा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, ताप्ती पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका नीना कटलर, प्रकल्प प्रमुख देव सरकटे, सह समन्वयक अमित चौधरी, सचिन पाटील यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. अथर्व इंगळे या विद्यार्थ्याच्या ओघवत्या भाषणाने स्पर्धेची सुरवात करण्यात आली. सूत्रसंचलन जीवन महाजन यांनी तर प्रास्ताविक प्रकल्प समन्वयक समाधान जाधव यांनी केले.




पाच गटात स्पर्धा
पहिले ते दहावी आणि खुल्या अश्या पाच गटात स्पर्धा झाली. छत्रपती शिवाजी महाराज तर शिवरायांचे बालपण, माता जिजाऊ आणि बाल शिवाजी, महाराजांच्या शौर्याचे प्रतीक-प्रतापगड, शिवरायांचे शूरवीर मावळे, शिवरायांची गुणग्राहकता, युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज, राज्याभिषेक शिवछत्रपतींचा, आज शिवराय असते तर शिवरायांची युद्धनीती, छत्रपती शिवाजी महाराज- द मॅनेजमेंट गुरु, शिवशाही ते लोकशाही, छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ, शिवकालीन किल्ल्यांचे भू-सामारिक महत्त्व या विषयावर वकृत्व सादर झाले.

3 रोजी बक्षीस वितरण
स्पर्धकांचे 20 वर्ग करण्यात आले. प्रत्येक वर्गात दोन असे 40 परीक्षकांनी परीक्षण केले. सभाधीटपणा, विषय मांडणी, हावभाव, आवाजातील चढ-उतार आणि परीणामकारकता यावर आधारीत परीक्षण करण्यात आले.दोन परिक्षकांचे गुण एकत्र करुन प्रत्येक वर्गातील प्रथम तीन विजेते काढण्यात येणार आहे.या सर्व विजेत्यांची अंतिम फेरी बक्षीस वितरणाच्या दिवशी घेण्यात येणार आहे.नंतर तेथेच प्रत्येक गटातील प्रथम तीन विजेत्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, व रोख रक्कम व शिव चरीत्र देउन गौरवण्यात येणार आहे. अंतिम फेरी 3 मार्च रोजी सकाळी 10 वाजता तर बक्षीस वितरण 11 वाजता नाहाटा कॉलेज लायब्ररी हॉल, भुसावळ येथे होणार आहे.

यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
स्पर्धा यशस्वीतेसाठी योगेश इंगळे, ज्ञानेश्वर घुले, प्रदीप सोनवणे, विक्रांत चौधरी, अमितकुमार पाटील, प्रा.डॉ.शामकुमार दुसाणे, शैलेंद्र महाजन, भूषण झोपे, हितेंद्र नेमाडे,राजू वारके, कुंदन वायकोळे, राहुल भारंबे, ललित महाजन, उमेश फिरके, केतन महाजन, शिरीष कोल्हे, चंद्रकांत सूर्यवंशी, अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील आदींनी परिश्रम घेतले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !