शिवरायांचे आठवावे रूप, आठवावा प्रताप !
भुसावळ शहर व तालुका मराठा समाजाच्या मिरवणुकीत छत्रपतींच्या सजीव देखाव्याने वेधले लक्ष ः रावेरात दुचाकी रॅली व शिवचरीत्रावर प्रदर्शन
भुसावळ : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त भुसावळ विभागात अभिवादन करण्यात आले. भुसावळ शहरासह व विभागात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. भुसावळातून बुधवारी विविध ठिकाणावरून सवाद्या चार मिरवणुकी निघाल्या. रेल्वे स्थानकासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मान्यवरांची उपस्थिती होती. रावेर शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली तसेच भव्य मिरवणूकही काढण्यात आली.
भुसावळात विद्यार्थ्यांनी सादर केले पथनाट्य
भुसावळ- बियाणी पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांंनी शिवाजी महाराज व मावळ्यांची वेषभूषा साकारत अश्वावरून मिरवणूक काढण्यात आली. नगरसेवक मनोज बियाणी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. प्रसंगी बियाणी कंपनीचे व्यवस्थापक गोपाळ ठाकुर, राजु पारीख, प्रवीण भराडीया, मुख्याध्यापिका सोफिया फ्रान्सीस उपस्थित होत्या. मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर पथनाट्य सादर केले. टिंबर मार्केटमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मिरवणुकीची सांगता झाली.



मराठा सेवा संघाच्या मिरवणुकीने वेधले लक्ष
भुसावळ- शहर व तालुका मराठा सेवा संघातर्फे शिवाजी नगरातून बुधवारी सकाळी सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, मॉडर्न रोड, सराफ बाजार, मरीमाता रोड, जवाहर डेअरी या मार्गाने ही मिरवणूक टिंबर मार्केटजवळ आल्यानंतर तिचा समारोप झाला. मिरवणुकीत भुसावळ मराठा समाजातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचे बैठकी स्मारक आणि ताप्ती पब्लिक स्कूलतर्फे महाराजांचं मंत्रीमंडळ असे दोन सजीव देखावे साकारण्यात आले. मिरवणुकीत झांज पथक, लेझीम व ढोल पथक आणि दोन बेस दोन टॉपच्या साह्याने महाराजांचे पोवाडे आणि गीत वाजवण्यात आले. मिरवणुकीत नगरसेवक मुकेश गुंजाळ, राजेंद्र आवटे, अॅड.तुषार पाटील, नरेश पाटील, ईश्वर पवार, तुषार बोरसे, उज्वल बोरसे, अॅड.सुशील बर्गे, संजय शिंदे, राजू बावडेकर, कृष्णा शिंदे तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले.
ताप्ती पब्लिक स्कुल
भुसावळ- ताप्ती पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी नगरमधून मिरवणूक काढली. लेझीम पथक व सजीव देखावे लक्षवेधी ठरले. मिरवणूक मॉडर्न रोड, सराफ बाजार, मरीमाता रोड, जवाहर डेअरी या मार्गाने येऊन टिंबर मार्केटमध्ये विसर्जीत झाली.
जळगाव जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभाग
भुसावळ- जळगाव जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभागातर्फे उत्तर महाराष्ट्र समन्वयक योगेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली. योगेंद्र पाटील व जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आली. प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष ईस्माइल गवळी, विजय तुरुकेले, सुनील जोहरे, विनोद पवार, संजय सपकाळे, नितीन पटाव, प्रवीण पाटील, अशोक सोनवणे, अनिल साळवे, मुकेश सुरळकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
नगरपालिकेत प्रतिमा पूजन
भुसावळ- नगरपालिकेमध्ये आमदार संजय सावकारे व नगराध्यक्ष रमण भोळे यांनी प्रतिमा पूजन केले. यावेळी मुख्याधिकारी करुणा डहाळे, नगरसेवक अॅड.बोधराज चौधरी, पिंटु ठाकुर, माजी नगरसेवक वसंत पाटील, भाजपा शहराध्यक्ष दिनेश नेमाडे, प्रमोद नेमाडे, सतीष सपकाळे, लेखापाल संजय बाणाईते यांच्यासह पदाधिकारी, कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, आमदारांच्या हस्ते रेल्वे स्थानकासमोरील अश्वारुढ पुतळा व टिंबर मार्केटमधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पुजन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष रमण भोळे, माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, नगरसेवक पिंटु कोठारी, मुकेश गुंजाळ, पिंटु ठाकुर, नमा शर्मा आदींची उपस्थिी होती.
महाराष्ट्र मंडळ ऑर्डनन्स फॅक्टरी
भुसावळ- आयुध निर्माणीतील छत्रपती शिवाजी उद्यानात शिवजयंती उत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष रमेश पाटील होते. प्रमुख पाहुणे महाव्यवस्थापक राजीव पुरी यांच्यासह अप्पर महाव्यवस्थापक वसंत निमजे, सुरक्षा अधिकारी देशपांडे, लेखापाल अनंत मूर्ती, प्रशासनिक अधिकारी तरुण कुमार यांच्यासह आयुध निर्माणी कर्मचारी संघ, ऑर्डनन्स फॅक्टरी कामगार युनियन, ऑर्डनन्स फॅक्टरी मजदूर युनियन, बहुजन सुरक्षा कर्मचारी संघ, एससीएसटी असो., क्लेरीकल असो., सुपरवायझर असो., एनजीओ असो., बौद्ध मंडळ, महर्षी वाल्मिक मंडळ, ओम महर्षि वाल्मिक मंडळ, महाराष्ट्र मंडळ पदाधिकारी, ऑर्डनन्स फॅक्टरी एम्प. को. ऑफ केडिट सोसायटीचे सच्चानंद गोधवानी, राजर्षि शाहू प्रतिष्ठानचे बाविस्कर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रकाश कदम यांनी तर आभार सतीश शिंदे यांनी मानले. यशस्वीतेसाठी दीपक आंबेडकर, प्रशांत सोनवणे, शेखर सूर्यवंशी, विनोद महाजन, तुषार बडगुजर, वसंत पाटील, राकेश शिर्के, केतन पाटील, जयसिंग कदम, अमोल पाटील, ईश्वर चौधरी, विवेक कदम, सुरेश सुरवाडे, रावसाहेब पाटील, संतोष जाधव, सत्यवान बिंद्रा, नितीन देशमुख, राजू बादशाहा, संदीप पाटील, किशोर पाटील, पी. बी. महाजन, किरण बावस्कर, अरुण पाटील, लक्ष्मण वाघ, दीपक ढेमे, चेतन चौधरी, लक्ष्मण पाटील, रवि ठाकरे, चंदू बोरसे, गणेश बाविस्कर, गिरीष येवले, संदीप चौधरी, रीतेश तायडे, मिलिंद अडकमोल, सागर तायडे, एम.एस.राऊत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
खिर्डीत शिवजयंती साजरी
खिर्डी- ग्रामपंचायतीत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच चारू नितीन नेहते, ग्रामसेवक गोकुळ सोनवणे, पोलिस पाटील प्रदीप पाटील, ग्रामपंचायत सदस्य नीळकंठ बढे, अलताफ बेग, पवन चौधरी, सुलोचना कोचुरे, तेजस्विनी सुपे, ग्रामपंचायत कर्मचारी योगेश कोळंबे, विपीन झांबरे, प्रदीप कोचुरे व गावातील नागरीक राजु कोचुरे, सुधीर चौधरी, कोचुरे, आकाश कोचुरे, अतुल कोचुरे आदी उपस्थित होते.
रावेरात निघाली दुचाकी रॅली
रावेर- शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त रावेर शहर व परीसरात ठिक-ठिकाणी प्रतिमा पूजन करण्यात आले तसेच मिरवणूक काढण्यात आली तसेच दुचाकी रॅली काढण्यात आली शिवाय शिव चरीत्रावर प्रदर्शन भरविण्यात आले. शहरातील जिजाऊ नगरातील माँ जिजाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच सजविलेल्या घोडा-गाडीत शिवाजी महाराज यांची प्रतिमा ठेवून पूजा व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर घोड्यावर आरुढ असलेले शिवाजी महाराजांच्या वेषभूषेत मुकेश पाटील (विवरे), मावळे योगेश बारी, जयेश चौधरी, समाधान मराठे, वैभव महाजन, दीपक महाजन, दुर्गेश मोपारी तसेच सजविलेल्या घोडागाडीत जिजाऊच्या रुपात ऐश्वर्या नाईक तर बाल शिवाजी म्हणून यश महाजन यांची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात जुना सावदा रोड, पोलिस ठाणे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, डॉ.हेडगेवार चौक, मेन रोड, भोई वाड्यातून शिवाजी चौकात आल्यानंतर मिरवणुकीची सांगता झाली.
यांची होती उपस्थिती
यावेळी आमदार शिरीष चौधरी, उद्योजक श्रीराम पाटील, बाजार समिती सभापती श्रीकांत महाजन, राष्ट्रवादी अध्यक्ष नीळकंठ चौधरी, योगराज महाजन, प्रशांत पाटील, घनश्याम पाटील, किशोर पाटील, राजेश शिंदे, राजेंद्र पाटील, सुनील पाटील, कल्पना पाटील, दीपक पाटील, पी.आर.चौधरी, दिलीप कांबळे उपस्थित होते. दरम्यान, मराठा मंगल कार्यालयात शिवजयंती निमित्त शिवचरीत्रावरील टेबल टॉप प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार शिरीष चौधरी यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी उद्योजक श्रीराम पाटील यांच्या सह शिव प्रेमी उपस्थित होते. रेल्वे स्थानकावरील होळ येथे बसविण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याला शहर व परीसरातील हजारो भाविकांनी पुष्पहार अर्पण केलेा. यावेळी रात्रीच्या सुमारास पुतळ्याला संरक्षक जाळी बसविण्यात आली.
यावल महाविद्यालय
यावल- कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे होत्या. डॉ.संध्या सोनवणे यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. इतिहास विभाग प्रमुख प्रा.व्ही.बी.पाटील तसेच डॉ.संध्या सोनवणे यांनी विचार व्यक्त केले. सूत्रसंचलन डॉ.एस.पी.कापडे तर आभार उपप्राचार्य ए.पी.पाटील यांनी मानले. यावेळी प्रा.मनोज पाटील, प्रा.अरुण सोनवणे, प्रा.सी.के.पाटील, प्रा.राजेंद्र थिगडे, प्रा.राजू पावरा, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी मिलिंद बोरघडे, संतोष ठाकूर, अमृत पाटील, दशरथ पाटील यांनी परीश्रम घेतले.
