बोदवड येथे आमदारांच्या आश्वासनानंतर जनसेवक विनोद पाडर यांचे उपोषण मागे


Public servant Vinod Padar’s hunger strike called off after MLAs’ assurances at Bodwad बोदवड : सर्व मागण्या मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिल्यानंतर जनसेवक विनोद पाडर यांनी बुधवारी आपले उपोषण तूर्त मागे घेतले.

आमदारांचे सकारात्मक आश्वासन
29 फेब्रुवारीपासून जनसेवक विनोद पाडर यांनी शंभर टक्के शिक्षण व आरोग्य सुविधा मोफत द्याव्यात या मागणीसाठी उपोषण छेडले हाते. मुला-मुलींमध्ये कुठलाही लिंगभेद करू नका, आठ लाखांचा निकष वार्षिक उत्पन्नाचा लावू नका, त्याची मर्यादा वाढवून द्या, आरोग्याकरीता पाच लाखापर्यंत सरकार जो खर्च उचलते त्या खर्चाची मर्यादा वाढून किमान ती 25 लाख करावी व राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था व त्या सरकारी असतील खाजगी असतील, इंग्लिश मीडियम असेल, उच्च शिक्षण असेल या सर्व ठिकाणी शिक्षण शंभर टक्के मोफत मिळावे या मागणीसाठी गेल्या सात दिवसापासून जनसेवक विनोद पाडर यांनी भुसावळ रोड जिजाऊ नगर येथे आमरण उपोषण छेडले होते. या उपोषणाला बोदवड शहरातीलच नव्हे तर तालुक्यातील जनता जनतेने चांगला प्रतिसाद दिला. आमदार चंद्रकांत पाटील यांनी सर्व मागण्या मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर तूर्त उपोषण मागे घेण्यात आले.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !