खासदार संजय राऊत यांनी ‘राज्य सरकारवर’ केला हा धक्कादायक आरोप
MP Sanjay Raut made this shocking allegation on the ‘state government’ मुंबई : खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. राज्यात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यातून सरकारला हप्ता मिळत असल्याने राज्य सरकारला काहीही देणे-घेणे नाही, असे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. याप्रकरणी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिले आहे.
ड्रग्जवरून साधला राज्य सरकारवर निशाणा
गुरुवारी प्रसार माध्यमांशी बोलतांना संजय राऊत यांनी ड्रग्ज आणि ऑनलाईन जुगारावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, राज्यात सातत्याने उघडपणे गोळीबाराच्या घटना घडत आहेत. आमदार गोळीबार करतात, हत्या, लुटमारीच्या घटना घडत आहेत. गुजरातमधून नाशिक, पुणे आणि मुंबईत हजारो कोटींचे ड्रग्ज येत आहेत. मात्र हे सरकार काय करतंय? गृहमंत्री काय करतायेत?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.



राऊत म्हणाले तर जुगाराबाबत पुरावेही देणार
जुगारामुळे राज्यातील तरुण पिढी उध्वस्त होत आहे. मात्र सरकारला त्याचे देणेघेणे नाही कारण याच जुगार अड्ड्यांकडून सरकारला हफ्ता येतो. आता फडणवीस यांनी हे फेटाळले तर मी त्यांना पुरावे देईन, असेही राऊत यांनी सांगून खळबळ उडवून दिली आहे. कुटुंब उध्वस्त असल्याची दखल घेत आर.आर.पाटील यांनी लेडीज बार बंद केले होते, अशी आठवणही त्यांनी सांगितले.
प्रकाश आंबेडकर नाराज नाहीत
महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या बैठकीवरही प्रतिक्रिया देताना खासदार राऊत यांनी प्रकाश आंबेडकर हे नाराज नसून त्यांच्याशी आमची सकारात्मक चर्चा झाली. त्यांनी बैठकीत प्रस्ताव मांडला त्यावर चर्चा करून जो निर्णय झाला तो आता ते कार्यकारिणीपुढे मांडून आमच्याशी पुन्हा चर्चेला येतील, असे संजय राऊत यांनी सांगितले. दरम्यान, याबाबतचे वृत्त दिव्य मराठी पोर्टलवर प्रसिद्ध झाले आहे.





