निवडणूक आल्या की गॅस सिलिंडरच्या दरात होते घट : उद्धव ठाकरे
When elections come, the price of gas cylinders will come down : Uddhav Thackeray मुंबई : पाच वर्ष महागाई वाढवायची व निवडणूक जवळ आली की गॅस सिलिंडरंचे दर कमी करायचे, असा हा प्रकार असल्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यहे हे सध्या धाराशिव दौर्यावर असून ते सातत्याने पंतप्रधान मोदींसह भाजपवर निशाणा साधत आहेत.
यापुढे मोदी सरकार येणार नाही
उद्धव ठाकरे म्हणाले की, ”आज पुन्हा एकदा घोषणांचा पाऊस पाडला जातोय. आपलं घटनाबाह्य सरकार आहे, शेवटं अर्थसंकल्प सादर करणारे भाजप सरकार सुद्धा आहे. शिवाय मोदी सरकाने जो अर्थसंकल्प सादर केला तो, शेवटचा अर्थसंकल्प आहे. कारण पुढील सरकार हे मोदींचे नसेल. आज पेपरमध्ये वाचलं की काही गोष्टींच्या किंमती त्यांनी कमी केल्या आहेत, पण हे निवडणुकीच्या काळात होणारच. पण मतदानावेळी आपण बटण दाबलं की, दुसर्या दिवशी सगळ्याच्या किमती पुन्हा वाढलेल्या असतील. त्यामुळे पाच वर्ष जनतेला गॅसवर ठेवून निवडणुकीच्या काळात गॅसच्या किमती कमी करायच्या हे नाटक आपल्याला समजलेलं आहे. त्यामुळे केवळ उत्साहात काम करणं चालणार नाही”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.








