सावखेडासीम गावातील भाविक महिलेचा पंढरपुरात अपघाती मृत्यू


यावल (शुक्रवार, 24 जुलै 2026) : यावल तालुक्यातील सावखेडासीम गावातील महिलेचा पंढरपूर वारीदरम्यान अपघाताने मृत्यू झाला अंजनाबाई रामलाल पाटील (65) असे मृत महिलेचे नाव आहे.

बसच्या धडकेने महिलेचा मृत्यू
अंजनाबाई या पंढरपूर वारीसाठी बसने गेल्यानंतर गणगापूर–तुळजापूर करून पंढरपूरच्या मार्गे मोहोळ येथे गुरुवार, 23 रोजी रात्री नऊ वाजता शौचाला जात असताना महामंडळाच्या बस (क्रमांक एम.एच.14 एन.ई. 7160) ने जोरदार धडक दिल्याने त्यांचा मृत्यू ओढवला. तत्पूर्वी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. याबाबत माहोळ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

आमदार अमोल जावळे यांना भाजपा कार्यकर्ते दिनेश पाटील, कमलाकर पाटील यांनी कळवल्यानंतर त्यांनी तत्काळ त्यांनी दखल घेत मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याचे कळवले व त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयत महिलेवर शुक्रवार, 24 रोजी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत वृद्धेच्या पश्चात पती, दोन मुले, सुना, नातवंडे व मुली असा परिवार आहे. त्या रामलाल नागो पाटील यांच्या पत्नी होत.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !