भाजपा 12 खासदारांचे तिकीट कापणार !
BJP will cut the ticket of 12 MPs ! मुंबई : राज्यातील जवळपास 12 खासदारांचा आगामी निवडणुकीतून पत्ता भाजपाकडून कट होणार असल्याचा दावा केला जात आहे. भाजपने राज्यतील विद्यमान खासदारांचे पक्षांतर्गत तीन सर्व्हे केले होते. त्यात डझनभर खासदारांचा स्ट्राईक रेट समाधानकारक नसल्याने हा निर्णय घेतला जाईल, असे म्हटले जात आहे. या संदर्भात एबीपी माझा या वृत्तवाहिनेने वृत्त दिले आहे.
नव्या चेहर्यांना मिळणार संधी
सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भाजपकडू धक्कातंत्र अवलंबण्यात येईल. अनेक विद्यमान खासदारांना तिकीट नाकारून त्यांच्याजागी नव्या चेहर्यांना संधी दिली जाणार आहे. उमेदवारी देताना विद्यमान खासदारांनी गत पाच वर्षांत किती प्रभावी कामगिरी केली? हाच एकमेव निकष डोळ्यांपुढे ठेवण्यात आला आहे त्यामुळे येत्या दोन दिवसांत भाजपच्या उमेदवारांची दुसरी यादी येईल तेव्हा त्यात जवळपास डझनभर नावे नवीन असतील. भाजपने राज्यात केलेल्या पक्षांतर्गत सर्व्हेतही जवळपास डझनभर खासदारांची कामगिरी समाधानकारक नसल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे ही शक्यता वाढली आहे.








