पाच वर्षांचा वनवास खूप झाला : पंकजा मुंडे यांच्या सूचक विधानाने राज्यात खळबळ
Five years of exile is too much: Pankaja Munde’s suggestive statement stirs excitement in the state
बीड : भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे या बीडमधील एका सभेतील वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत आल्या आहेत. पाच वर्षांचा वनवास खूप झाला असून आता वनवास नको, असे सूचक वक्तव्य त्यांनी करीत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. माझ्या समर्थकांपुढे कोणंतही पद मला मोठं नाही, असेही त्यांनी म्हटलं आहे .
कार्यकर्त्यांपुढे पद मोठे नाही
कार्यकर्त्यांपुढे पद मोठे नसल्याचे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. “खड्ड्यात गेलं ते पद-बिद मला त्याच्याशी काही घेणं-देणं नाही. पण तुमचे प्रेम हे माझ्यासाठी महत्वाचे आहे. तुम्हाला चांगला विकास देऊन, सन्मार्ग देऊन, त्या प्रेमाची मी पावती देणार आहे, त्याची परतफेड मी करणार आहे. माझ्याकडून तुम्हाला मान खाली घालावे लागेल असं मी काहीही कृत्य करणार नाही. असे झाले तर तो माझ्या जीवनातील शेवटचा दिवस असेल”, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या








