भुसावळात मराठीच्या पेपरलाही पडला कॉप्यांचा पाऊस


इंग्रजी, उर्दूच्या पेपरला 25 परीक्षार्थींनी मारली दांडी

भुसावळ : बारावी परीक्षेसाठी गुरुवारी झालेल्या मराठीच्या पेपरालाही सर्रास कॉपी सुरू असल्याचे चित्र होते. बंदोबस्तावर असलेल्या यंत्रणेने हातावर हात ठेवल्याचे कॉपी पुरवणार्‍यांच्या पथ्थयावर पडल्याने थेट खिडकीला लटकून आपल्या मित्रांपर्यंत कॉपी पोहोचण्यात आल्या. दरम्यान, इंग्रजीनंतर मातृभाषेच्या पेपरालाही शहरात सर्रास कॉपी सुरू असल्याने शिक्षण विभागाच्या कॉपीमुक्त अभियानाचा पुरता फज्जा उडाल्याचे शहरात चित्र दिसून आले.

पोलिसांच्या भूमिकेवरही संशय
पोलिसांची नजर चूकवून कॉपी बहाद्दर काही शाळेतील परीक्षा केंद्रावरील आपल्या परीक्षार्थींपर्यंत कॉपी पोहोचवण्यात यशस्वी झाले. शहरातील सर्वच परिक्षा केद्रांवर पोलिसांचा बाहेरून बंदोबस्त लावण्यात आल्यावरही कॉपी सुरू असल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील डीएस हायस्कूलमध्ये बारावींच्या इंग्रजीच्या पेपरला कॉप्या पुरविणारे बाजूच्या उद्यानातून गेट बंद असल्याने कंपाऊंड वरून उड्या मारून आत जाऊन थेट खिडक्यांना लटकत कॉप्या पुरवताना दिसून आले.




25 परीक्षार्थीं गैरहजर
शहरातील के. नारखेडे विद्यालय, डीएस हायस्कूल, डीएल हिंदी विद्यालय, नाहाटा कॉलेज, बी.झेड. उर्दू हायस्कूल, संत गाडगेबाबा विद्यालयातील एक हजार 456 परीक्षार्थींची बैठक व्यवस्था असलीतरी प्रत्यक्ष पेपरला एक हजार 435 परीक्षार्थी बसले. 21 परीक्षार्थी गैरहजर राहिले तर दुपारी उर्दू शाखेच्या पेपरला चार परीक्षार्थींनी दांडी मारली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !