सतीश अण्णांचे वक्तव्य गैरसमजातून ; संजय पवार तर गल्लीतले नेते : आमदार एकनाथराव खडसे
Satish Anna’s statement from misunderstanding ; Sanjay Pawar is a street leader: MLA Eknathrao Khadse जळगाव : माजी मंत्री सतीश अण्णा पाटील यांनी केलेले वक्तव्य हे गैरसमजातून असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी पत्रकार परीषदेत केला. संजय पवार यांनी केलेल्या आरोपांवर उत्तर देताना आमदार खडसे म्हणाले की मी, पक्षाच्या नेत्यांना उत्तर देण्यास बांधील आहे, गल्लीतल्या नेत्यांना उत्तर देण्यास नाही. एकनिष्ठतेचे संजय पवार यांनी बोलू नये, असा टोलाही खडसे यांनी लगावला. रावेर लोकसभेतील उमेदवारीवरून होत असलेल्या आरोपांचे स्पष्टीकरण आमदार खडसे यांनी जळगावातील निवासस्थानी झालेल्या पत्रकार परीषदेत दिले.
प्रकृतीमुळे निवडणूक लढवणे अशक्य
आमदार खडसे म्हणाले की, काही महिन्यांपूर्वीच प्रकृती अस्वास्थामुळे लोकसभेची निवडणूक लढविणार नसल्याचे कळविले होते. त्यामुळे मी पक्षाला अंधारात ठेवलेले नाही. तसेच रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तगडा उमेदवार दिला जाणार असून, लुटुपुटुची लढाई या मतदारसंघात होणार नाही तर काट्याचीच लढत होईल, असे त्यांनी सांगितले.



संजय पवारांवर निशाणा : हे तर गल्लीतले नेते
संजय पवार यांनी केलेल्या आरोपांबाबत आमदार खडसे म्हणाले की, मी माझ्या पक्षाच्या नेत्यांना उत्तर देईल, गल्लीतल्या नेत्यांना नाही. मी उमेदवारी का केली नाही..? याबाबतची माहिती पक्ष नेतृत्वाला दिली आहे तसेच जे काही असेल ते सर्व मी माझ्या पक्षाच्या नेत्यांना उत्तर देईल, गल्लीतल्या नेत्यांना का उत्तर देऊ, अशा शब्दात खडसेंनी संजय पवार यांना टोमणा लगावला. एकनिष्ठतेचे संजय पवारांनी बोलू नये, शरद पवारांना सोडून अजित पवारांकडे गेले आणि मला काय, ते निष्ठा शिकवतील. संजय पवार यांनी स्वतःकडेच अनेक पदं ठेवली आहेत. ते काय दुसर्यांबाबत बोलतील, असेही खडसे म्हणाले.
रावेर लोकसभेसाठी तगडा उमेदवार
रावेर लोकसभेसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अनेक जण इच्छुक आहेत. याबाबतचा निर्णय पक्ष नेतृत्व घेणार आहे. येत्या दोन दिवसात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून रावेर लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर केला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.





