भुसावळ शहरात निर्माल्य संकलन रथाचे उद्घाटन

सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्था व सखी श्रावणी पर्यावरण ग्रुपचा उपक्रम


An initiative of Sakhi Shravani Mahila Multipurpose Organization and Sakhi Shravani Environment Group भुसावळ : महाशिवरात्री आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून निर्माल्य विसर्जन सेवा रथ येथील सखी श्रावणी बहुउद्देशीय संस्थेतर्फे सुरू करण्यात आला. नदी, तलाव, विहिर स्वच्छ रहावी आणि पर्यावरणाची कुठलीही हानी होऊ नये तसेच निर्माल्याची सुद्धा कोणत्याही प्रकारे विटंबना होऊ नये यासाठी निर्माल्य विसर्जन रथाचे उद्घाटन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.

निर्माल्याचे योग्यरित्या लागणार विल्हेवाट
स्थानिक विठ्ठल मंदिर वॉर्ड भागात आयोजित कार्यक्रमास प्रजापिता ब्राम्हकुमारी भुसावळ केंद्राच्या ज्योती दिदी तसेच साकेगाव केंद्राच्या रुखमा दिदी, निसर्ग व पर्यावरण संघटनेचे नाना पाटील यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. निर्माल्य विसर्जन सेवा रथाचे महंत प्रशांत वैष्णव यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून आणि पूजन करून उद्घाटन करण्यात आले. वृक्षारोपण करतेप्रसंगी आवळा, बेल, सीताफळ यासह फुलझाडे लावण्यात आलीत. निर्माल्य संकलन रथ ही संकल्पना नागरिकांना अतिशय आवडली आहे. परिसरातील नागरिक व महिलांनी त्वरित उत्स्फूर्तपणे निर्माल्य या रथात आणून दिले.




यांची होती उपस्थिती
म प्रसंगी ज्योती दिदी, रूखमा दिदी, रोहित महाले, मोहिता चौधरी, चंद्रकला बागुल यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या. संस्थापक अध्यक्षा राजश्री नेवे यांनी प्रास्ताविकात निर्माल्य संकलन व पर्यावरण बाबत सविस्तर माहिती यावेळी दिली. आभार उज्वला बागुल यांनी मानले. यावेळी राष्ट्रीय स्वयंम सेवक संघाचे जिल्हा संघचालक डॉ.विजय सोनी, सुरेंद्र पाटील, पत्रकार उज्वला बागुल, सखी श्रावणी महिला संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नेवे, माया चौधरी, अनुराधा टाक, स्मिता माहुरकर, भाग्यश्री नेवे, वंदना झांबरे, कामिनी नेवे, मोहिता चौधरी, खान्देशचे मानद पशूकल्याण अधिकारी गौसेवक रोहित महाले, महंत प्रशांत वैष्णव, चंद्रकांत बागुल, राजू सपकाळे, राजेश करोडपती, उमेश नेवे, मनीषा चौधरी, वैशाली कोळी, कल्पना चौधरी, वर्मा, सुरेखा चौधरी, चंद्रकला बागुल यांचीही उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी उमेश नेवे यांचे विशेष सहकार्य लाभले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !