यावल ग्रामीण रुग्णालयात मोफत सर्व रोग निदान, दंत व शस्त्रक्रिया शिबिर

1050 रुग्णांची तपासणी ; 36 रुग्णांवर झाल्या शस्त्रक्रिया


Free All Disease Diagnosis, Dental and Surgery Camp at Yaval Rural Hospital यावल : यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान व जिल्हा रुग्णालय जळगाव आणि राज्य आरोग्य सोसायटी महाराष्ट्र शासन अंतर्गत चार दिवसीय मोफत सर्व रोग निदान, दंत व शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. या शिबिरात तीन दिवसात एक हजार 50 रूग्णांची मोफत तज्ज्ञ डॉक्टरांनी आरोग्य तपासणी केली. तीन दिवसात येथे 36 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली.

1050 रुग्णांची तपासणी
यावल येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये गुरुवार, 14 मार्चपासून चार दिवसीय मोफत सर्व रोग निदान, दंत व शस्त्रक्रिया शिबिर सुरू झाले. या शिबीरात गेल्या तीन दिवसात एक हजार 050 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यातील 36 रुग्णांची गरजेनुसार तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने विविध प्रकारच्या मोफत शस्त्रक्रियादेखील करण्यात आले. तज्ज्ञ डॉ.सचिन अहिरे, डा.ॅस्वप्निल कळसकर, डॉ.प्राची सुरतवाला, डॉ.निता भोळे, डॉ.रुपाली कळसकर, रूग्णालयाचेे वैद्यकिय अधिकारी डॉ.विजय कुरकुरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजु तडवी, डॉ.तुषार सोनवणे, डॉ.प्रशांत जावळे, डॉ.किशोर वाणी, नेत्र चिकित्सक अधिकारी युवराज ठोंबरे यांची उपस्थिती होती. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किरण पाटील, नॉडेल अधिकारी डॉ.सुशांत सुपे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकिय अधिकारी डॉ.विजय कुरकुरे, डॉ.वैशाली निकुंभ, देवेंद्र जवरे, अधिपरिचारीका ज्योत्ना निंबाळकर, आरती कोल्हे, वैशाली बैरागी, संगीता गावित, पी.एम.पाटील, पिंटू बागुल, वसंतकुमार सदानशिव, रविंद्र माळी आदींनी परिश्रम घेत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !