जळगावसह रावेर लोकसभा मतदारसंघात इतके मतदार बजावणार हक्क


In Raver Lok Sabha Constituency along with Jalgaon, so many voters will exercise their rights जळगाव : जळगाव लोकसभा मतदार संघात आजअखेर स्त्रिया, पुरुष आणि तृतीयपंथी यांची मतदार नोंदणी संख्या 19 लाख 81 हजार 472 तर रावेर लोकसभा मतदार संघात 18 लाख 11 हजार 951 इतक्या मतदारांची नोंद झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून देण्यात आली.

जळगाव लोकसभा मतदार संघात एकूण पुरुष मतदार नोंद 10 लाख 31 हजार 60 एवढी असून स्त्रियांची संख्या 9 लाख 50 हजार 329 एवढी आहे तर तृतीयपंथी एकूण 83 आहेत. अशी सर्व मिळून 19 लाख 81 हजार 472 एवढी नोंद आज अखेर पर्यंत आहे.




विधानसभा मतदार संघनिहाय संख्या खालीलप्रमाणे
जळगाव शहर विधानसभा मतदार संघामध्ये पुरुष संख्या 207019 स्त्रीयांची संख्या 188113, तृतीय पंथी संख्या 32 असे एकूण 39 लाख पाच हजार 164 मतदार आहेत. जळगंव ग्रामीण विधानसभा मतदार संघामध्ये पुरुष संख्या 1,66330 स्त्रीयांची संख्या- 1,55302 तृतीय पंथी संख्या -03 असे एकूण 32 लाख एक हजार 635 मतदार आहेत.

अमळनेर (एससी) विधानसभा मतदार संघामध्ये पुरुष संख्या 155220 स्त्रीयांची संख्या-146010 तृतीय पंथी संख्या 3 असे एकुण 301233 मतदार आहेत.
एरंडोल विधानसभा मतदार संघामध्ये पुरुष संख्या 147479, स्त्रियांची संख्या 138322 तर तृतीय पंथी संख्या 10 असे एकुण 285811 मतदार आहेत.

चाळीसगांव विधानसभा मतदार संघात
पुरुष संख्या 189801, स्त्रीयांची संख्या- 169851 तृतीय पंथी संख्या -29 असे एकूण 359681 मतदार आहेत.

पाचोरा विधानसभा मतदार संघात पुरुष संख्या 165211 स्त्रीयांची संख्या – 152731 तृतीय पंथी संख्या 6 असे एकुण 317948 मतदार आहेत.

रावेर लोकसभा मतदार संघात एकूण पुरुष मतदार नोंद 9 लाख 37 हजार 54 एवढी असून महिलांची संख्या 8 लाख 74 हजार 843 एवढी आहे तर तृतीयपंथी एकूण 54 आहेत. अशी सर्व मिळून 18 लाख 11 हजार 951 एवढी नोंद आज अखेर पर्यंत आहे.

विधानसभा मतदार संघ निहाय संख्या खालील प्रमाणे आहे
चोपडा (एसटी) विधानसभा मतदार संघामध्ये मध्ये पुरुष संख्या 164152, स्त्रीयांची संख्या- 156584, तृतीय पंथी संख्या 02 असे एकुण 320738 मतदार आहेत.

रावेर विधानसभा मतदार संघात एकुण पुरुष संख्या 153883, स्त्रीयांची संख्या- 144447, तृतीय पंथी संख्या -02 असे एकूण 298332 मतदार आहेत.

भुसावळ (एससी ) विधानसभा मतदार संघात पुरुष संख्या एक लाख 54 हजार 58 स्त्रीयांची संख्या एक लाख 43 हजार 539 तर तृतीय पंथी संख्या 37 असे एकूण दोन लाख 97 हजार 634 मतदार आहेत.

जामनेर विधानसभा मतदार संघात पुरुष संख्या166837,स्त्रीयांची संख्या- 154519, तृतीय पंथी संख्या -00 असे एकुण 321356 मतदार आहेत.

मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात पुरुष संख्या 151628, स्त्रियांची संख्या 142683, तृतीय पंथी संख्या-07 असे एकुण 294318 मतदार आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर विधानसभा क्षेत्र हे रावेर लोकसभा मतदार संघात येते. तेथील पुरुष संख्या एक लाख 46 हजार 496 तर स्त्रीयांची संख्या एक लाख 33 हजार 71, तृतीय पंथी संख्या सहा असे एकूण दोन लाख 79 हजार 573 मतदार आहेत.

असे एकत्रीत दोन्ही लोकसभा मतदार संघातील एकूण पुरुष संख्या 19 लाख 68 हजार 114 तर एकूण स्त्रियांची संख्या 18 लाख 25 हजार 172, एकूण तृतीय पंथी संख्या 137 मिळून एकूण 37 लाख 93 हजार 423 मतदार आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !