भूकंपांच्या धक्क्यांनी हादरले मराठवाडा
Marathwada was shaken by earthquake shocks छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांमध्ये गुरुवारी पहाटे भूकंपाचे तीव्र धक्के बसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. भूकंप होत असल्याची शक्यता गृहित धरून अनेक नागरिक घराबाहेर पडल्याने मोठे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मराठवाड्यातील हिंगोली, परभणी व नांदेड भागात गुरुवारी सकाळी 6.08 मिनिटांनी भूकंपाचा धक्का मोठ्या प्रमाणावर जाणवला. रिश्टर स्केलवर त्याची 4.5 नोंद करण्यात आली.
भूकंपाच्या धक्क्यांनी अनेक घरांना तडे
भूकंपांच्या ती्र धक्क्युळे दांडेगाव आणि परिसरातील काही घरांना तडे गेल्याचे सांगण्यात आले. दोन घरे पडल्याची माहिती वसमतचे पूर्णा कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिली तर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या वृत्तास दुजोरा दिला असून यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे ते म्हणाले. यापूर्वीही या भागात भूगर्भातून मोठे आवाज झाल्याचे अहवाल पाठविण्यात आले होते.



लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे 30 सप्टेंबर 1993 रोजी बसलेल्या धक्क्यानंतर हा अलिकडच्या काळातील मोठा धक्का असल्याचे सांगण्यात येते. या धक्क्यामुळे नागरिक भयभीत झाले असून धक्का जाणवताक्षणी अनेकजण घराच्या बाहेर पडले.