भाजप ओबीसी मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी शिशिर जावळे
भुसावळ : भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते शिशिर दिनकर जावळे यांची महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाच्या प्रदेश सचिवपदी नुकतीच निवड करण्यात आली.
निवडीनंतर शुभेच्छांचा वर्षाव
सामाजिक क्षेत्रातील अग्रेसर व ओबीसी चळवळीतील युवा नेतृत्व तसेच ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन दरबारी ओबीसींच्या विविध मागण्यांचा पाठपुरावा करणारे म्हणून जावळे यांची ओळख आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शिफारशीनुसार व महाराष्ट्र भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी त्यांची महाराष्ट्र राज्य ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिवपदी नियुक्ती केली. निवडीनंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ओबीसी चळवळ प्रगल्भ करून ओबीसी समाजातील सर्वसामान्यांच्या व समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कायम कटीबद्ध असल्याचं व या पदाच्या माध्यमातून अहोरात्र ओबीसींसाठी काम करणार असल्याचे प्रतिपादन शिशिर जावळे यांनी व्यक्त केले.







