सण उत्सव शांततेत साजरे करण्याची परंपरा जपा : पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर


यावल : यावल शहरातील नागरीकांची सलोख्याची परंपरा आहे आणि हीच परंपरा कायम राहील. यावलचे नागरिकच सुज्ञ आहेत व सर्व धर्मीय बांधव शांतता प्रस्थापित ठेवण्यास पुढे सरसावतात हे कौतुकास्पद आहे मात्र तरीदेखील या उत्सवात परस्परांच्या भावना दुखावणार नाही, असे कृत्य कोणी करू नये, असे आवाहन यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी केले. यावल पोलीस ठाण्यात बुधवारी सायंकाळी घेण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते.

28 रोजी निघणार मिरवणूक
यावल शहरात गुरुवार, 28 मार्च रोजी तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. या जयंतीनिमित्त यावल शहरातील सातोद रस्त्यावरील पेठेच्या श्रीराम मंदिरातून भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर यावल पोलीस ठाण्यात बुधवारी सायंकाळी शांतता समितीची बैठक बोलवण्यात आली. या बैठकीमध्ये पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करतांना पोलीस निरीक ठाकुर यांनी सांगितले की, यावल शहराची शांततेची परंपरा आहे. सर्वधर्मीय बांधव येथे सलोख्याने राहतात, हीच परंपरा यापुढेदेखील कायम राहील व आगामी सण-उत्सव शांततेत साजरे होतील, या शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये परस्पर धर्मीयांच्या भावना दुखवणार नाही यासाठी सर्व धर्मीय बांधवांनी काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.



यांची बैठकीला उपस्थिती
बैठकीमध्ये काँग्रसचे जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान, भाजपा तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, शहराध्यक्ष निलेश गडे, शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे शरद कोळी, संतोष खर्चे, पप्पू जोशी, भाजपाचे गोपालसिंग पाटील, माजी उपनगराध्यक्ष शेख असलम, गुलाम रसुल शेख, गफ्फार शाह, शेख हबीब, विकास मराठे, शेख याकुब, करीमोद्यीन चिरागोद्याीन, एजाज देशमुख, शेख अजहर, रफीक खान, जावेद पिंजारी, हवालदार सुशील घुगे, अनिल साळुंके सह आदींची उपस्थिती होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !