फैजपूरातील प्रति जेजुरी खंडोबा यात्रोत्सवाचे होळी पौर्णिमेला आयोजन

ऐतिहासिक वारसा : भाविकांची होणार अलोट गर्दी : ग्रामीण संस्कृतीची धरोवर


संजय सराफ
Per Jejuri Khandoba Yatrotsava in Faizpur organized on Holi Purnima फैजपूर : भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील 1936 च्या प्रथम ग्रामीण काँग्रेस अधिवेशन जगभारत प्रसिद्ध आहे. यानिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ.राजेंद्र प्रसाद, लालबहादूर शास्त्री, साने गुरुजी, केशवसूत, विनोबा भावे, धनाजी नाना चौधरी या राष्ट्र पुरूषांच्या पदस्पर्शाने पावन ऐतिहासीक तथा खान्देशातील प्रति जेजुरी फैजपूर शहरात सुमारे 565 वर्षांपूर्वीच्या पुरातन जागृत व हिंदू-मुस्लीमांचे अढळ श्रद्धास्थान असलेल्या श्री खंडोचा भगवान (घोडेवाले बाबा) देवस्थानाचा 10 दिवसीय यात्रा महोत्सव फाल्गुन होळी पौर्णिमा रविवार, 24 मार्च 2024 पासून सालाबादाप्रमाणे साजरा होत आहे.

होळकर घराण्याची सनद प्राप्त
पुरातन जागृत खंडोबा मंदिरात पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर, राजा छत्रपती शिवाजी महाराज, पेशवा, कवयित्री बहिणाबाई चौधरी यासह अनेक थोर संतांनी-राष्ट्रपुरुषांनी आवर्जुन भेटी दिल्याच्या नोंदी आहे. आजही या मंदिरास मध्य प्रदेशातील इंदूर येथील सुप्रसिद्ध होळकर घराण्याची सनद प्राप्त होते. या मंदिराचे तत्कालीन ब्रह्मलीन गादीपती परमपूज्य आत्मानंद महाराज यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात आचार्य विनोबा भावेंसोबत भूदान आंदोलनात तर तत्कालीन गादीपदी महंत बालब्रह्मचारी घनश्यामदासजी महाराज यांनी स्वातंत्र्यानंतरच्या काळात आमदार डॉ.सिंधूताई चौघरी (फैजपूर) सोबत गोवां मुक्ति आंदोलनात सहभाग घेतला होता.




ग्रामस्थांच्या दृष्टांतानंतर मंदिराची उभारणी
येथून जवळच असलेल्या अडीच किलोमीटर अंतरावरील न्हावी गावातील खंडोबा मंदिरात प्राणप्रतिष्ठेसाठी खंडोबाची मूर्ती बैलगाडीतून नेत असताना फैजपूर येथे विश्रामासाठी थांबल्यानंतर बैलगाडीचे चाक जमिनीत फसल्यानंतर बैलगाडी काढण्यासाठी तब्बल 51 बैल जोड्यांची मदत घेऊनही बैलगाडी तसूभरही पुढे झाली नाही. ग्रामस्थांना झालेल्या दृष्टांतानुसार या जागीच मंदिराची ग्रामस्थांनी उभारणी करून फाल्गुन शुद्ध पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर श्री खंडोचा भगवानची मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा पूजा विधी सोहळा मोठ्या धार्मिक जल्लोषात साजरा केला. यानंतर या कुलदैवत स्थापना दिनाचे औचित्य म्हणून फैजपूर, न्हावी ग्रामस्थ देवस्थानावर विविध धार्मिक, पूजापाठ अनुष्ठानासह आनंद उत्सव साजरा करतात. हे खंडोबा देवस्थान खानदेशातील प्रति जेजूरी म्हणून ओळखले जाते.

1948 मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
जागृत खंडोबा देवस्थानातीत काळ्या पाषाणातील मूर्ती खंडित झाल्यामुळे पांढर्‍या शुभ्र संगमवर पाषाणाची अश्वारूढ खंडोबा मूर्ती म्हाळसा आई बानाई देवीची मूर्ती तत्कालीन गादीपती आत्मानंद महाराजांना इंदूर सरकार नरेश होळकर यांनी 7 डिसेंबर 1948 दिली. प्राणप्रतिष्ठा फाल्गुन होळी पौर्णिमेला केल्याचा पुरातन शिलालेख आजही मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ऐतिहासिकतेची साक्ष देतो. तत्कालीन गादिपती तथा या संस्थानचे शिल्पकार महंत बाल ब्रह्मचारी घनश्यामदासजी महाराज यांचे अद्वितीय कार्य उल्लेखनीय आहे. मूळ अयोध्यावासी असलेले घनश्यामदासजी यांना गादीपती आत्मानंदजी महाराजांचे उत्तराधिकारी म्हणून सन मे 1967 मध्ये गादिपती विराजमान केले. या देवस्थानाचा कारभार सुरळीत चालण्यासाठी पुरातन काळात राजा होळकरांनी जमीन दिली.

जातीय सलोख्याचा वारसा
महामंडलेश्वर पुरुषोत्तमदास महाराजांनी व उत्तराधिकारी पवनदासजी महाराज यांनी महंत घनश्यामदासजीचा जातीय सलोखाख्या वारसा जपत खंडोबा देवस्थान परिसरात एक धार्मिक नवचैतन्य निर्माण केले आहे. रोज सकाळ- संध्याकाळ अध्यात्माच्या रंगात महाराजांसमवेत शेकडो भाविक भक्त रंगून जातात. दररोज शिवस्तुती, रामरक्षा, रामस्तुती, जानकीस्तुती, खंडोबास्तुती नित्यनायमाणे देवस्थानात होते. 22 जानेवारी रोजीच्या अयोध्या येथील श्री राम जन्म भूमी मंदिर मूर्ती प्रतिष्ठापना निमित्त देवस्थान परिसरात सव्वा लाख दीपोत्सवाचा धार्मिक कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. महाशिवरात्रीच्या दिवशी भुसावळ तापी नदी ते फैजपूर अशी कावड यात्रा पवनदाजी यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली. खंडोबा देवस्थानचे विद्यमान गादीपती महामंडलेश्वर पुरुषोत्तमदासजी महाराज, उत्तराधिकारी पवनजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पुजारी राम मनोहरदाजी महाराज, राजेश शर्मा, दिगंबर फेगडेख हबीब मणियार आदी भाविक यात्रेचे काटेकोर नियोजनासाठी परिश्रम घेत ओ.

यात्रोत्सव आदिवासींसाठी उत्सव पर्व
फैजपूरातील खंडोबाची यात्रा ही एक ग्रामीण संस्कृती धरोवरच म्हटली जाते. मोबाईल व संगणकीय युगात सुद्धा ग्रामीण भागातील संस्कृती आजही यात्रेच्या निमित्ताने जपली जाते. यात्रेमध्ये भाविक नवीन संकल्प तसेच नवसफेड करतात तसेच शेतकरी बंधू शेती उत्पन्न, नवीन बैल जोडी खरेदीनिमित्त धार्मिक पूजा, अनुष्ठान, जप पूर्ण करतात. त्यानंतर लहान मुलांची कानटोचणी, जाऊळ, नवरथ आदी धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने होतात. यात्रोत्सवानिमित्त मनोरंजनाच्या कार्यक्रमास उंच पाळणे, विविध खाद्यपदार्थांची दुकाने, गुळाची रेवडी, गाठी शेव, चिवडाचा खवैय्ये लाभ घेतात शिवाय संसाराला लागणारी विविध भांडीकुंडी, लाकडी उपकरणे आदींची खरेदी करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होते. या शिवाय तमाशाचे फड व मौत का कुंवा तसेच कसरतीचे खेळ सादर केले जातात.

यात्रोत्सवावर तिसर्‍या डोळ्याची नजर
यात्रा महोत्सव काळात काही अनुचित प्रकार टाळून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी राखण्यासाठी प्रांताधिकारी देवयानी यादव, सहा.पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, सहा.निरीक्षक निलेश वाघ, पोलीस उपनिरीक्षक विनोद गाभणे, बबन पाटोळे, मैनुद्दीन सय्यद, विजय चौधरी, योगेश दुसाने, फैजपूर मंडळाधिकारी हनीफ तडवी, बी.एल.तायडे, तलाठी तेजस पाटील, तुषार जाधव, बी.एल.तायडे, संजय राजपूत झडत आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !