भुसावळातील बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये वार्षिक पुरस्कार वितरण समारोह
Annual Award Distribution Ceremony at Biyani Military School, Bhusawal भुसावळ : शहरातील बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये शनिवार, 23 रोजी वार्षिक पुरस्कार वितरण समारंभ झाला. अध्यक्षस्थानी बियाणी एज्युकेशन ग्रुपचे चेअरमन मनोज बियाणी होते. प्रमुख अतिथी म्हणून भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजानन पडघन, डॉ.वृषाली चौधरी व बियाणी एज्युकेशन ग्रुपच्या सचिव डॉ.संगीता बियाणी तर विशेष अतिथी म्हणून राजू पारीख व प्रवीण भराडीया उपस्थित होते.
शारीरीक, मानसिक विकासावर भर द्यावा
मान्यवरांच्या हस्ते विविध शैक्षणिक व शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांना प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस वितरण करण्यात आले. पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांनी बियाणी मिलिटरी स्कूल विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांचे उत्कृष्ट आयोजन करत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासक्रमासोबत शारीरिक व मानसिक विकासावर भर द्यावा तसेच यूपीएससी, एमपीएससी, एनडीएसारख्या स्पर्धा परीक्षांची आतापासून तयारी करावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी बियाणी एज्युकेशनच्या विविध संस्थांचे प्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शाळेचे प्राचार्य डी.एम.पाटील यांनी आभार मानले.







